जाहिरात

Pune News : PMPML चा प्रवास होणार आणखी सुरक्षित; पुणे मनपाचा मोठा निर्णय

पुणे प्रशासनाकडून एक व्हॉट्सअॅप क्रमांक शेअर करण्यात आला आहे. यावर प्रवासी पुराव्यासह तक्रार दाखल करू शकतात.

Pune News : PMPML चा प्रवास होणार आणखी सुरक्षित; पुणे मनपाचा मोठा निर्णय

Pune PMPML : मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवनेरी बसमध्ये चालक आयपीएल सामना पाहत असतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुणे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे चालकांसाठी पीएमपीएल प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बस चालवताना चालकाने नियम मोडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता पुणे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बस चालवताना मोबाइलचा वापर किंवा तंबाखू सेवन केले तर  PMPML चालकांचे निलंबन केलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एका चालकाला बस चालवताना आयपीएल सामना पाहिल्याबद्दल निलंबित करण्यात आलं होतं.

Mumbai News: मुंबईत बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढली! 13 महिन्यात तब्बल 'इतक्या' कोटींचा दंड वसूल

नक्की वाचा - Mumbai News: मुंबईत बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढली! 13 महिन्यात तब्बल 'इतक्या' कोटींचा दंड वसूल

आता याच प्रकारानंतर PMPML ने आपल्या कर्मचाऱ्यांना कडक सूचना जारी केल्या आहेत. PMPL कडून चालकांना आणि वाहकांना कर्तव्यावर असताना मोबाइल फोन वापरण्यास, हेडफोन घालण्यास किंवा तंबाखू आणि पान मसाला खाण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. चालक आणि वाहकांविरोधात तक्रार करण्यासाठी PMPL कडून मोबाइल नंबर देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. 9881495589 या व्हॉट्सअॅप नंबरवर पुणेकर तक्रार करू शकतात. चालकाविरोधातील पुराव्यासह तक्रार सादर केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.