जाहिरात

Atharva Sudame Reel: अथर्व सुदामेला PMPML ची नोटीस; महिलांसंबंधित रील अंगलट येण्याची शक्यता, प्रकरण काय?

Atharva Sudame Reel: पीएमपी प्रशासनाच्या परवानगीशिवाय बसमध्ये व्यावसायिक रील चित्रीत करण्यात आले. रीलमध्ये पीएमपीचे अधिकृत गणवेश, ई-तिकीट मशीन आणि बॅचचा बेकायदेशीर वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Atharva Sudame Reel:  अथर्व सुदामेला PMPML ची नोटीस; महिलांसंबंधित रील अंगलट येण्याची शक्यता, प्रकरण काय?

Atharva Sudame Reel: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे (Atharva Sudame) याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. पीएमपीच्या बसमध्ये विनापरवाना रील चित्रीत करणे आणि महिला वाहकांची बदनामी केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

पुण्यातील लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे सध्या कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) 2 जानेवारी रोजी त्याला नोटीस बजावून सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

नोटीस बजावण्यामागची मुख्य कारणे

पीएमपी प्रशासनाच्या परवानगीशिवाय बसमध्ये व्यावसायिक रील चित्रीत करण्यात आले. रीलमध्ये पीएमपीचे अधिकृत गणवेश, ई-तिकीट मशीन आणि बॅचचा बेकायदेशीर वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय या रीलमध्ये महिला वाहकांचे चित्रण आक्षेपार्ह आणि अपमानजनक पद्धतीने करण्यात आले आहे. यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असल्याचे पीएमपीने म्हटले आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओंमुळे सार्वजनिक सेवेतील विश्वासार्हता कमी होते आणि संस्थेच्या प्रतिमेचे नुकसान होते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पाहा तो VIDEO

(नक्की वाचा- Pune News: भीमाशंकर मंदिरात संतापजनक प्रकार, पुणे शिवसेना जिल्हाप्रमुखाचा खळबळजनक CCTV व्हिडीओ व्हायरल)

काय आहे नोटीसमध्ये?

पीएमपीएमएलने अथर्व सुदामेला सूचना दिल्या आहेत की, संबंधित रील इन्स्टाग्रामवरून तात्काळ हटवण्यात यावी. यापुढे पीएमपीच्या कोणत्याही मालमत्तेचा किंवा बसचा वापर करून विनापरवाना व्हिडिओ किंवा फोटो शेअर करू नये. स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्यालयात उपस्थित राहून सात दिवसांत लेखी स्पष्टीकरण द्यावे.

atharva Sudame

पुढील कारवाईचा इशारा

जर सात दिवसांत समाधानकारक उत्तर मिळाले नाही किंवा रील हटवली गेली नाही, तर प्रचलित कायद्यांनुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि प्रतिष्ठेवर अशा मजकुराचा विपरीत परिणाम होतो, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com