तेजस मोहतुरे, गोंदिया
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गोंदियामध्ये मोठं खिंडार पडलं आहे. अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी हजोरा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे, खासदार नामदेव कीरसान यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय लांजेवार यांच्यासह पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये यावेळेस पक्षप्रवेश केला. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असुन सुद्धा मोठ्या प्रमाणावर पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
(नक्की वाचा - मविआत मोठा भाऊ कोण? पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदाच थेट बोलले)
खासदार प्रफुल पटेल यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. येत्या काही दिवसात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू राहील असा दावा देखील नाना पटोले यांनी केला आहे. 15 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(नक्की वाचा - ठाकरेंनी हुकमचा एक्का टाकला, आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य, शिंदे-फडणवीसांचे टेन्शन वाढणार?)
प्रफुल पटेल यांच्या जिल्हामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षातील गळती थांबवण्यासाठी अजित पवार गटाकडून काय प्रयत्न केले जातात, हे पाहावं लागेल.