लाडकी बहीण योजनेची घोषणा करून महायुतीने महाविकास आघाडीवर कुरघोडी केली होती. पण त्याला आता उद्धव ठाकरे यांनी जाशाच तसे उत्तर देत महायुतीचे टेन्शन मात्र वाढवले आहे. छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत शिंदे - फडणवीसांचे टेन्शन वाढवले आहे. उद्धव ठाकरे यांनी आरक्षणा बाबत पहिल्यांदाच आपली स्पष्ट भूमीका मांडली. त्यांनी टाकलेल्या या हुकमी एक्क्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. शिवाय शिंदे फडणवी आणि पवारांची चांगलीच कोंडी होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरक्षणाबाबत काय म्हणाले ठाकरे?
आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाज एकमेका विरोधात ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मी पहिल्यांदाच आरक्षणाबाबत खुले पणाने आणि स्पष्ट पणे बोलणार आहे असे जाहीर पणे सांगितले. आरक्षण हे हक्काचे आहे. ते मिळालेच पाहीजे. यासाठी शिवसेनेचा पाठींबा असेल. मात्र आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे सर्वांनी पहिले एक व्हा आणि दिल्लीकरांना वाकवा असे आवाहन त्यांनी केले. पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवणारा ठराव विधानसभेत आणा, त्याला आपला पाठिंबा असेल. हा ठराव केंद्राला पाठवा. केंद्र जेव्हा याचा ठराव लोकसभेत आणेल तिथेही शिवसेना त्याला पाठिंबा देईल अशी जाहीर घोषणा ठाकरे यांनी केले. त्यांच्या या भूमीकेमुळे शिंदे आणि फडणवीसांचे टेन्शन मात्र नक्की वाढणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - मविआत मोठा भाऊ कोण? पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदाच थेट बोलले
जरांगे- हाकेंना चर्चेला बोलवा
आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या आधीही अशा अनेक बैठका झाल्या. त्यातून काय मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली पण मराठा आरक्षण मिळालं का? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. राजकारण्यांना बैठकांना बोलवण्या पेक्षा जरांगे आणि हाकेंना सरकारने बोलवावे. त्यांना समोरा समोर बसवा. त्यांना काय हवं आहे त्यानुसार निर्णय घ्या. त्यांच्या हक्काचे त्यांना दिलेच पाहीजे असेही ठाकरे म्हणाले. जरांगे आणि हाके उपोषण करत आहेत. त्यांच्या जीवाशी सरकार का खेळ करत आहे असा आरोपही त्यांनी केला. दोन समाजात भांडण लावून सत्ता मिळण्याचा यांचा डाव आहे. त्याला बळी पडू नका असे आवाहन ही त्यांनी केले. संपुर्ण महाराष्ट्र एक झाला तर त्यांना शुन्या पेक्षाही खाली आणू असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
फसव्या योजनांचा भांडाफोड करा
निवडणुकीच्या तोंडावर योजना आणल्या जात आहेत. पण या आधीच्या योजनांचे काय झाले असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. लाडकी बहीण योजना आणली पण भावांचे काय असा प्रश्न त्यांनी केला. मुली आणि मुले यांच्यात भेदभाव करू नका. या आधीही यांनी पक्ष फोडले, घरं फोडली. आता सर्व सामान्यांची घरं तुमच्या राजकारणासाठी फोडू नका असे ठाकरे म्हणाले. गावागावात जावून यांचा भांडाफोड करा. लाडकी बहीण ही योजना निवडणुकीपर्यंतच असेल. त्यामुळे सरकारचा हा डाव ओळखा असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांची वीजबील माफी केली आहे. पण थकबाकीचे काय असा प्रश्नही ठाकरे यांनी यावेळी केला.
ट(नक्की वाचा- Pune News : पुण्यातील ही ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित; पोलिसांनी जारी केली यादी)
चोरट्या नो भामट्या नो, ठाकरे का भडकले?
लोकसभेला ज्याकाही मोजक्या जागा आल्या त्या तुमचा खरा विजय नाही. चोरट्या नो भामट्या नो हा खरा विजय नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी शिंदेंचे नाव न घेता केला. शिवसेना आणि धनुष्य बाण यामुळे तो विजय झाला. मात्र आता विधानसभेला तसे होणार नाही. मशाल चिन्ह घरा घरात पोहचवा. विधानसभेला यांना कोणत्या ही स्थिती हरवायचे म्हणजे हरवायचे. ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे असे ठाकरे म्हणाले. गद्दारीसाठी, पक्षा फोडीसाठी हा महाराष्ट्र ओळखला जावू नये. तशी या महाराष्ट्राची ओळख होवू देणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. हे थापेबाज सरकार आहे. स्वत:चे पाप लपवण्यासाठी ते योजना आणत आहेत. पण त्याही फसव्या आहेत असेही ते म्हणाले. गद्दारी करू पण खुर्ची सोडणार नाही या पेक्षा खुर्ची सोडू पण गद्दारी करणार नाही हा खरा शिवसैनिक आहे असेही त्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world