Dharashiv News : प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत ZP च्या मुलांना 'अळ्यांचे पौष्टिक बार'; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरूच

जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पौष्टीक चॉकलेटमध्ये पुन्हा अळ्या सापडल्या आहेत. 

जाहिरात
Read Time: 1 min

ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी

धाराशिवमधील (Dharashiv News) पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शालेय पोषण आहारात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरूच असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे गावातून संताप व्यक्त केला जात आहे. (Zilla Parishad school in Dharashiv)

जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पौष्टीक चॉकलेटमध्ये पुन्हा (poor quality Nutrition bars) अळ्या सापडल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेतील चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्या आहेत. विद्यार्थ्यांना पोषण तत्त्वांसाठी आणलेले चॉकलेट वाटपापूर्वी तपासले असता त्यात अळ्या  आढळल्या. 

नक्की वाचा - Karnataka Crime News: भुताने झपाटल्याचा संशय, अमानुष मारहाणीत महिलेचा तडफडून मृत्यू, मुलासह तिघांना अटक 

यापूर्वी  धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या, किडे आढळल्याची तक्रार  पालकांकडून करण्यात आली होती. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ज्वारी,  बाजरीपासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार (चॉकलेट) दिले जातात. जिल्हा परिषद शाळांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या मिलेट न्यूट्रेटिव्ह बारचा पुरवठा केला जातो. आणि धक्कादायक बाब म्हणजे या बारमध्ये अळ्या सापडल्याने गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article