वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Alliance) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar hospitalized) यांना 31 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर तातडीने त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या हृदयाच्या धमनीत ब्लॉकेज असल्याचं आढळून आलंय, त्यावर आज 1 नोव्हेंबर रोजी उपचार केले जाणार आहे.
नक्की वाचा -प्रचारावेळी हृदयविकाराचा झटका, ठाकरेंच्या उमेदवारा बरोबर काय झालं?
आज प्रकाश आंबेडकरांची अँजिओप्लास्टी होणार असून त्यांच्या हृदयाच्या धमनीतील ब्लॉकेज उघडण्यात येणार आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यनातून माहिती शेअर केली आहे. त्यामध्ये दिल्यानुसार, सध्या प्रकाश आंबेडकरांची प्रकृती स्थिर आहे. न्याहारीसाठी त्यांना पोहे आणि काळा चहा देण्यात आला होता. यानंतर त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र वाचल्याचाही त्याच उल्लेख आहे. लवकर त्यांच्या अँजिओग्राफीचा अहवाल शेअर केला जाणार आहे.