
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकर अखेर अटक करण्यात आली आहे. गृह विभागातील विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली असून लवकरच कोल्हापूर पोलीस याबाबत लवकरच स्पष्टीकरण देतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या एक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रशांत कोरटकर याने अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आता कोरटकरला तेलंगणामधून अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रशांत कोरटकर याने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली होती. तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला होता. त्याचे हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर 25 फेब्रुवारीपासून प्रशांत कोरटकर हा फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंवरच नाही तर पंतप्रधान मोदींवरही गाणं; कुणाल कामराची 'ही' सहा गाणी व्हायरल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world