जाहिरात

Kolhapur News : प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढणार? काय आहे कारण?

Kolhapur News : प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर केला तरी बुधवारी सायंकाळपर्यंत त्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे कळंबा कारागृहातून त्याची सुटका अद्यापही झालेली नाही.

Kolhapur News : प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढणार? काय आहे कारण?

विशाल पुजारी, कोल्हापूर

Kolhapur News : प्रशांत कोरटकरला जामीन मिळूनही कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने कोल्हापुरातच मुक्काम करावा लागणार आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. सध्या कोरटकर कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठीत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

बुधवारी सायंकाळी उशीरा त्याला जामीन मंजूर झाला. काही अटी शर्ती आणि 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. या जामीन मंजुरीनंतर काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. जर आज या कागदपत्रांची पूर्तता झाली तर कोरटकरला कळंबा करागतुहातून बाहेर काढलं जाईल. अन्यथा उद्यापर्यंत त्याचा मुक्काम याच कारागृहात असणार आहे.

(नक्की वाचा- कोल्हापुरातील 10 गावातील नागरिक होणार मालामाल; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं आश्वासन)

प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर केला तरी बुधवारी सायंकाळपर्यंत त्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे कळंबा कारागृहातून त्याची सुटका अद्यापही झालेली नाही. जर आज कागदपत्रांची पूर्तता झाली तर कोटरकरची सुटका होण्याची शक्यता आहे. 

(नक्की वाचा- बदलापुरात घरे महागणार; पंतप्रधान आवास योजनेतील 8 लाखांचं घर दुपटीने महागलं)

प्रशांत कोरटकरवर दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे त्याला पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी त्याच्या वकिलांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: