Latest News Update : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती आज आपला अहवाल सादर करणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदविले. या प्रकरणी समितीने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठवला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी उपचारास नकार दिल्याने ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रुग्णालयानेही याप्रकरणी 10 लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याची कबुली दिली आहे.
तहव्वुर राणाचा भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाची भारताकडे प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Live Update : क्रिकेटपटू केदार जाधव करणार भाजपामध्ये प्रवेश?
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव लवकरच राजकीय इनिंग सुरु करण्याची शक्यता आहे. आजवर क्रिकेटचं मैदान गाजवलेला केदार राजकीय आखड्यात प्रवेश करणार आहे. केदार जाधव भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये केदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. उद्या म्हणजेच मंगळवारी मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात केदार जाधव भाजपाच प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची शक्यता आहे.
LIVE Updates: गॅसच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ
पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने गॅसवर 50 रुपयांची वाढ केली आहे.
Nagpu Fire: नागपूरमध्ये ताजबाग परिसरात आग
नागपूरच्या मोठा ताजबाग परिसरात आग लागली आहे
कुलरच्या कारखान्याला आग लागल्याची माहिती...
अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू..
आगीचे कारण स्पष्ट..
LIVE Update: पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढले, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कावर दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशात महागाईचा भडगा उडणार असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यती आहे.
LIVE Update: तनिषा भिसे मृत्यू प्रकरण: मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉ. घैसास यांचा राजीनामा
तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला आहे.
Dharashiv News: रामनवमी उत्सवात तरुणाचा अश्लील नाच, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
धाराशिव शहरात रविवारी रामनवमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला, मात्र या दरम्यान एक संतापजनक व्हिडिओ आता समोर आला आहे. रामनवमी दरम्यान निघालेल्या मिरवणुकीत एका तरुणाने अश्लील नाच केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणूक पोहोचल्यावर या तरुणाने शर्ट काढून अश्लील हावभाव करत नाचण्यास सुरुवात केली. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकारावर नागरीकानी यावर तीव्र संताप व्यक्त केला असून, सार्वजनिक ठिकाणी आणि धार्मिक उत्सवांमध्ये अशा असभ्य वर्तन करणाऱ्यांना चाप बसविण्याची आवश्यकता आहे.
LIVE Updates: सोन्याच्या भावात घसरण कायम, आज 400 रुपयांची घसरण
सोन्याच्या भावात आज 400 रुपयांची घसरण झाली असून गेल्या 3 दिवसात सोन्याच्या भावात 3 हजार रुपयांची तर चांदीच्या भावात 12 हजार रुपयांची घसरण झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटी विना सोन्याचे भाव 88 हजार 600 तर चांदीचे भाव 90 हजार रुपयांवर आले आहे. तर जीएसटीसह सोन्याचे दर 91 हजारांवर तर जीएसटी सह चांदीचे दर 92 हजार 700 रुपयांवर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ धोरण जाहीर केल्यानंतर जगात मंदीचे सावट असल्याने सोन्याच्या भावावर परिणाम झाल्याचा अंदाज सूर्य तज्ञांनी व्यक्त केला असून सोन्याचे भाव कमी होत असल्याने जळगाव सुवर्णनगरीत सोनं खरेदी करण्यासाठी महिला ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
अमरावतीत यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद
अमरावतीत यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद
अमरावती जिल्ह्याचं कमाल तापमान 42.6 अंशावर
सकाळपासूनच अमरावती जिल्ह्यासह शहरात उन्हाचे चटके
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अमरावती जिल्ह्याचा पारा 42 डिग्रीवर
9 व 10 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता
लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना उपचारासाठी मुंबईत हलवले
लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांना मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात नेण्यात येत आहे. कॉरिडॉरसारखी पद्धत अवलंबत त्यांना लातूरच्या विमानतळावर आणण्यात आले आहे. एअर अँब्युलन्सने मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे.
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 3000 तर निफ्टी 1000 अंकांनी खाली
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 3000 तर निफ्टी 1000 अंकांनी खाली
Pune News : संत तुकाराम साखर कारखाना निवडणुकीत संत तुकाराम शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व
संत तुकाराम साखर कारखाना निवडणुकीत संत तुकाराम शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व राखत माजी खासदार नानासाहेब नवले, दत्तात्रय जाधव व चेतन भुजबळ यांचा एकतर्फी विजय झाला आहे.
मावळ तालुक्यातील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलने जोरदार विजय मिळवत तिन्ही जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, दत्तात्रय जाधव आणि चेतन भुजबळ हे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर या निवडणुकीत चुरस निर्माण करणारे अपक्ष उमेदवार बाळासाहेब भिंताडे यांचा पराभव झाला असून साखर कारखान्यावर श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलचं वर्चस्व झाले आहे, 21 सदस्यांसाठी ही निवडणूक होती मात्र 18 जण बिनविरोध झाले तर तीन जागांसाठी चार जण रिंगणात होते..नूतन संचालक मंडळासमोर कारखान्याचा सर्वांगीण विकास, ऊस उत्पादकांच्या समस्या सोडवणे व पारदर्शक कारभार ही महत्त्वाची आव्हाने असणार आहेत.
बीड जिल्हा रुग्णालयाची धुरा डॉक्टर संजय राऊतकडे
बीड जिल्हा रुग्णालयाची धुरा आता डॉक्टर संजय राऊत यांच्याकडे आली आहे. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर कोरोना काळातील घोटाळ्याच्या आरोपानंतर त्यांचं अधिवेशनादरम्यान निलंबन करण्यात आलं होतं. त्यांची जागी आता संजय राऊत यांची जिल्हा शल्य चिकित्सकपदी वर्णी लागली आहे.. उपसंचालक डॉ. अर्चना भोसले यांनी हे आदेश काढले आहेत
नागपूरचे 77 वर्षीय ऑटोमोबाईल व्यावसायिक झहूर हसन यांचे विचित्र अपघातात निधन
नागपूरचे 77 वर्षीय ऑटोमोबाईल व्यावसायिक झहूर हसन यांचे रविवारी दुपारी एक विचित्र अपघातात दुःखद निधन झाले. ते गोरेवाडाकडे कामानिमित्त जात असताना एका अनियंत्रित झालेल्या टिप्परने त्यांच्या कारला चिरडले. ओव्हरलोड वाळू घेऊन जाणाऱ्या टिप्परने कारला शंभर फूट फरफटत नेत कारचा अक्षरशः चक्काचूर केला. हा टिप्पर रस्त्यालगतच्या पान टपरीमध्ये थेट शिरल्याने पान टपरी चालक 35 वर्षीय राजकुमार दुबे आणि त्यांचा एक ग्राहक जखमी झाले. नंतर क्रेनच्या सहाय्याने कारला हटवण्यात आले.
या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांची ज्यादा कुमक बोलवण्यात आली. नंतर संतप्त जमावाने टिप्परला आग देखील लावली.
नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, नाशिकमधील खळबळजनक घटना
नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावात घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवून दिले. घटनेत बायको स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे भाजल्याने गंभीर जखमी. आरोपी पती केदार हंडोरे स्वतःही जखमी झाला आहे. घटनेमागील कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहे.