Mithi River : महाराष्ट्रातील नद्यांची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. मुंबईतील नद्या तर मरणासन्न अवस्थेत आहेत. त्यातील मिठी नदी ही नदी कमी आणि गटार जास्त वाटू लागली आहे. कंपन्यांमधून सोडलं जाणारं सांडपाणी, नागरिकांनी टाकलेला कचरा यामुळे मिठी नदी काही दिवसात मरून जाईल की काय अशी भीती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान मिठी नदी गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कंत्राट घोटाळाही समोर आला असून आतापर्यंत या प्रकरणात दहा कंत्राटदारांची चौकशी करण्यात आली आहे. मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पात कथित अनियमितता आढळली आहे. याशिवाय मिठी नदीला श्वास घेण्यासाठी गाळ काढण्याच्या कंत्राटातील निधीच्या कथित गैरवापराबाबत प्राथमिक चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Property Tax : मुंबईकरांवर कराचा भार वाढणार? मालमत्ता कर 13 टक्क्यांपर्यंत वाढीचा प्रस्ताव
या प्रकल्पाशी संबंधित 10 कंत्राटदारांची चौकशी करण्यात आली आहे. त्याशिवाय कंत्राट प्रक्रियेसंदर्भातील माहिती महापालिकेकडे पोलिसांनी मागितली आहे. तसेच मिठी नदीतील गाळ काढतानाची चित्रफीतही पोलिसांनी मागितली आहे. गेल्या 20 वर्षांपासून हा प्रकल्प सुरू असून 1100 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण 18 कंत्राटदारांना या काळात कंत्राट देण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे. 2005 ते 2021 पर्यंत सर्व कंत्राटाची तपासणी करत आहेत.