
President nominated ujjwal nikam On Rajyasabha: विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची राज्यसभेवर (Rajyasabha) वर्णी लागली आहे. राष्ट्रपती नामनिर्देषित खासदार म्हणून उज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. उज्वल निकम यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते; भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि संसदेच्या वरिष्ठ सभागृह, राज्यसभेच्या प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांनाही राज्यसभेसाठी नामांकित केले आहे.
सविस्तर माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, केरळमधील ज्येष्ठ समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृह राज्यसभेवर नामांकित केले आहे.
उज्वल निकम यांनी 2024 च्या लोकसभेला उज्जल निकम यांनी उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला. त्यानंतर आता निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये उज्वल निकम यांनी काम पाहिले असून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.
The President of India has nominated Ujjwal Deorao Nikam, a renowned public prosecutor known for handling high-profile criminal cases; C. Sadanandan Maste, a veteran social worker and educationist from Kerala; Harsh Vardhan Shringla, former Foreign Secretary of India; and… pic.twitter.com/eN6ga5CsPw
— ANI (@ANI) July 13, 2025
विशेष सरकारी वकील ते राज्यसभेवर वर्णी...
उज्ज्वल निकम यांचा जन्म 30 मार्च 1953 रोजी महाराष्ट्रातील जळगाव येथे झाला. उज्ज्वल निकम यांनी विज्ञान शाखेत पदवी घेतली आणि जळगाव येथील एसएस मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आहे. उज्ज्वल निकम हे काही प्रसिद्ध न्यायालयीन खटल्यांमध्ये एक प्रमुख वकील आहेत.1991 मध्ये कल्याण बॉम्बस्फोटासाठी रविंदर सिंग यांना दोषी ठरवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
1993 मध्ये मुंबई सीरियल बॉम्बस्फोट प्रकरणात ते सरकारी वकील झाले तेव्हा त्यांच्या कारकिर्दीला मोठे वळण मिळाले. 2611 हल्ल्यानंतर पकडलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्या खटल्यात उज्ज्वल निकम हे सरकारी वकील होते. त्यांनी कसाबच्या फाशीच्या शिक्षेसाठी यशस्वीपणे युक्तिवाद केला आणि त्याला फाशी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world