पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपमध्ये केलं होतं स्नॉर्कलिंग; तोच अनुभव कोकणात कुठे घ्याल?

पाण्याखाली जाऊन आपल्याला रंगीबेरंगी मासे, कोरल, समुद्राखालील जैवविविधता, अपृष्ठवंशीय प्राणी यासारख्या गोष्टी पाहता येतात. स्कुबा डायविंग करणे अतिशय रोमहर्षक असतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावरुन लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो शेअर केले होते. यावेळी त्यांनी लक्षद्वीपमध्ये स्नॉर्कलिंग केल्याचे फोटोही समोर आले होते. हाच अनुभव तुम्ही कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरही घेऊ शकता. उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर स्नॉर्कलिंग किंवा स्कुबा डायव्हिंग तुमच्यासाठी आनंददायी अनुभव ठरू शकतो.

स्नॉर्कलिंग आणि स्कुबा डायव्हिंग दोन्ही साहसी खेळात फरक आहे. स्नॉर्कलिंग समुद्रसपाटीवर केलं जातं आणि स्कुबा डायव्हिंगमध्ये विविध उपकरणांसह समुद्राच्या तळावरील अनुभव घेता येतो.

Advertisement

मालवण : स्कुबा डायव्हिंगसाठी मालवण हे चांगलं ठिकाण आहे. येथे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेकडील भागात स्कुबा डायव्हिंग केलं जातं. मालवणला येण्यासाठी कुडाळ हे जवळचं रेल्वे स्थानक आहे. कुडाळहून साधारण 30 किलोमीटर अंतरावर कॅब किंवा बसने प्रवास करून तुम्ही मालवणात पोहोचू शकता. येथे प्रशिक्षित व्यक्ती तुम्हाला समुद्राच्या तळापर्यंत घेऊन जातात. सुरक्षिततेसाठी विविध उपकरणांसह तुम्हाला समुद्राच्या तळाशी नेलं जातं. स्कुबा डायव्हिंग करताना पाण्याखाली जाणारी व्यक्ती श्वास घेण्याच्या उपकरणांसह पाण्याखाली जाते. ही उपकरणे वापरल्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये जास्त वेळ चांगल्या प्रकारे श्वास घेता येतो. या उपकरणांमध्ये मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, नोज आणि माऊथ मास्क, स्कुबा सूट आणि पेडल असतात. समुद्राच्या तळाशी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या गाइडला फोटो काढण्यासही सांगू शकता, जेणे करून तुमच्या आयुष्यातील अनमोल अनुभव साठवून ठेवता येईल.

Advertisement


तारकर्ली : तारकर्लीमध्ये देवबाग किनारपट्टीवर त्सुनामी बेटांवर स्कुबा डायव्हिंग केलं जातं. येथून कुडाळ स्थानक 45 किलोमीटर अंतरावर आहे. पाण्याखाली जाऊन आपल्याला रंगीबेरंगी मासे, कोरल, समुद्राखालील जैवविविधता, अपृष्ठवंशीय प्राणी यासारख्या गोष्टी पाहता येतात. स्कुबा डायविंग करणे अतिशय रोमहर्षक असतं. येथे स्कुबा डायविंग करण्यासाठी सुरुवातीला मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं जातं. स्कुबा डायविंगसाठी पोहता येण्याची गरज नसते.

येथे स्कुबा डायव्हिंग व्यतिरिक्त इतर जलक्रीडांचाही आनंद घेऊ शकता. फ्लायबोर्डिंग हा देखील येथील प्रसिद्ध जलक्रीडा प्रकार आहे. या साहसी क्रीडा प्रकारात आपले पाय एका बोर्डवर बुटांमध्ये बांधले जातात. त्या बोर्डच्या खालून पाण्याच्या जोरदार प्रवाहाची एक नळी अथवा पाईप आलेला असतो. ते पाणी तिथून आपल्या पायाखालून बाहेर पडत असते, त्या पाण्याच्या वेगामुळे आपण पाण्यातून हवेत उंच उसळी घेऊ शकतो. यावेळी एक मार्गदर्शक तुमच्या सोबत असतो.

Advertisement

Topics mentioned in this article