जाहिरात

27 Dec Public Holiday: 27 डिसेंबर रोजी बँका बंद राहणार की चालू? सार्वजनिक सुट्टीवरून गोंधळ,सरकारचे स्पष्टीकरण

December 27 Public Holiday Fact Check: 27 डिसेंबर 2025 रोजी गुरु गोविंद सिंग यांची जयंती असते.

27 Dec Public Holiday: 27 डिसेंबर रोजी बँका बंद राहणार की चालू? सार्वजनिक सुट्टीवरून गोंधळ,सरकारचे स्पष्टीकरण
मुंबई:

27 डिसेंबरला सुट्टी आहे की नाही, यावरून मोठा संभ्रम निर्माण झाला होता. गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टद्वारे केला जात होता. याबद्दल महाराष्ट्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. 27 डिसेंबर 2025 रोजी गुरु गोविंद सिंग यांची जयंती असते. यानिमित्ताने सुट्टी असल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टद्वारे केला जात होता. गुरु गोविंद सिंग यांची जयंतीच्या निमित्ताने राजस्थान आणि पंजाबसारख्या काही राज्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रामध्येही ती आहे का ? असा प्रश्न सोशल मीडिया पोस्टद्वारे केल्या जात असलेल्या दाव्यांमुळे निर्माण झाला होता. 

नक्की वाचा: BMC Elections 2026: मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही ? जाणून घेणं झालं एकदम सोपे

27 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टीचा दावा खरा की खोटा ?

महाराष्ट्र सरकारने सोशल मीडियाद्वारे केल्या जात असलेल्या दाव्यांबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. X वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, " गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त 27 डिसेंबर 2025 रोजी भारत सरकारने देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. राजस्थान आणि पंजाबसारख्या काही राज्यांनी सुट्टी जाहीर केली असली तरी, संपूर्ण देशासाठी केंद्र सरकारचा असा कोणताही आदेश नाही. मात्र, दि. 27 रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका नियमानुसार बंद राहतील. या सुट्टीचा व्हायरल दाव्याशी थेट संबंध नाही."

27 डिसेंबरला बँका बंद राहणार

महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार 27 डिसेंबर रोजी चौथा शनिवार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. त्यानुसार 27 डिसेंबर 2025 रोजी बँका बंद राहतील. 

नक्की वाचा: पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटणे फाटा, वरसोली टोलनाके बंद पाडणार; आमदार सुनील शेळकेंचा इशारा

Listen to the latest songs, only on JioSaavn.com