जाहिरात

BMC Elections 2026: मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही ? जाणून घेणं झालं एकदम सोपे

How to check name in voter list: राज्यात 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार असून, यासाठी एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार आहेत.

BMC Elections 2026: मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही ? जाणून घेणं झालं एकदम सोपे
मुंबई:

21 डिसेंबर रोजी म्हणजेच रविवारी नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठीची मतमोजणी (Maharashtra Nagar Parishad, Nagar Panchayat Election Counting Date) होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात 29 महानगरपालिकांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. महानगरपालिकांसाठीचे मतदान 15 जानेवारीला होणार आहे. (BMC elections 2026 date?) 16 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतमोजणी होणार आहे. 16 जानेवारी रोजी 29 महानगरपालिकांवर कोणाचे वर्चस्व असेल याचे चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकांसाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजवावा असे आवाहन निवडणूक आयोगासह सगळ्याच राजकीय पक्षांनी केले आहे. मात्र मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे शोधणं अनेक मतदारांना कठीण जाते. मतदार यादीत आपले नाव कसे तपासायचे याचा सोपा मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

नक्की वाचा: Municipal Corporation Elections 2026: एका उत्तरावर ठरणार इच्छुकांचे भवितव्य, प्रश्नांची यादीच आली समोर

मताधिकार ॲप (How to Find name your name in Voter List through Matadhikar App?)

महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार' हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. ते सध्या फक्त ‘गुगल प्ले स्टोअर'वरून डाऊनलोड करता येईल. या ॲपद्वारे मतदाराचे नाव शोधण्यासाठी मतदाराला दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे ‘संपूर्ण नाव' किंवा ‘मतदार ओळखपत्रा'चा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. त्यानंतर जिल्हा आणि महानगरपालिकेच्या नावाची निवड केल्यानंतर आपले नाव दिसेल. याच ॲपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्राचे ठिकाणही कळू शकेल. त्याचबरोबर आपल्या प्रभागातील उमेदवाराविषयी अधिक माहितीदेखील जाणून घेता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून दिले आहे. (How to search voter list online?)  त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून ॲपप्रमाणे ‘नाव' किंवा ‘मतदार ओळखपत्रा'चा (EPIC) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल.

नक्की वाचा: Nanded News: धक्कादायक! हजारो मतदारांना मंगलकार्यात डांबलं? नांदेडमध्ये मोठा गोंधळ

29 महानगरपालिका आणि 3 कोटी मतदार 

महानगरपालिका निवडणुकांसाठी एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार असून त्यासाठी सुमारे 39 हजार 147 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 10 हजार 111 मतदान केंद्रांसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com