रेवती हिंगवे, प्रतिनिधी:
Pune Koragaon Park Accident CCTV Footage: पुणे शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. रविवारी पहाटे शहरात एका भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. पहाटे ४:३० च्या सुमारास बंड गार्डन मेट्रो स्टेशनवर एका वेगाने येणाऱ्या कारचा ताबा सुटला आणि ती खांबाला धडकली. अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघाताचा धक्कादायाक सीसीटीव्ही आता समोर आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात रविवारी पहाटे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. बंड गार्डन परिसरातील मेट्रो स्टेशनवर एका खांबाला कार धडकल्याने हा अपघात झाला. कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहाटे ४:३० च्या सुमारास बंड गार्डन मेट्रो स्टेशनवर एका वेगाने येणाऱ्या कारचा ताबा सुटला आणि ती खांबाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठे नुकसान झाले.
जेलमधून फिल्डिंग? धो- धो पावसात रक्त सांडलं, गणेश काळे मर्डरचे आंदेकर कनेक्शन!
अपघाताचा भयंकर व्हिडिओ| Accident CCTV Footage
बंडगार्डन मेट्रो स्टेशन चे खाली काळ्या रंगाची पोलोचा अपघात होऊन 2 मुलांचा मृत्यू झाला आहे, तिसरा मुलगा गंभीर जखमी असून त्यावर ससून हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत. यश प्रसाद भंडारी (वय 23 वर्षे रा थेरगाव पिंपरी चिंचवड) , ऋत्विक ऊर्फ ओम विनायक भंडारी (वय 23 वर्षे रा पिंपरीगाव) अशी मृतांची नावे असून खुशवंत टेकवाणी असे जखमी तरुणाचे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. खुशवंत टेकवाणी हा बीडचा रहिवासी असल्याचे माहिती प्राप्त होत आहे.
पुण्यात भीषण अपघात! दोघांचा मृत्यू.. धक्कादायक CCTV#Puneaccident #CCTV pic.twitter.com/zZnQIT1LzA
— Gangappa Pujari (@GangappaPujar07) November 2, 2025
दरम्यान, या अपघाताचा भयंकर सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुसाट वेगात असलेली चारचाकी गाडी मेट्रोच्या पिलरला धडकल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाडीचा वेग इतका होता की कारचा चुराडा झाला. कारमधील तरुणांनी मद्यप्राशन केल्याचा पोलिसांना संशय आहे. अपघात नेमका कसा झाला? गाडीचा वेग किती होता? तसेच मध्यप्राशन संबंध आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world