अविनाश पवार, पुणे:
Pune MLA Car Accident CCTV: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा सुरु आहे. निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून नेते मंडळींची धावपळ सुरु आहे. अशातच पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराच्या गाडीने एका चिमुकलीला उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रचाराच्या घाईत अपघात..
समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारने चिमुकलीला उडवल्याची घटना घडली आहे. आमदार कटके हे शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरकडे निघाले होते. यावेळी त्यांच्या भरधाव कारने ४ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिली. घटना रविवारी (दि. ३०) दुपारी शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर घडली.
Solapur News: तुळजापूरला निघालेल्या नवदाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू
या अपघातात शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय ४) ही गंभीर जखमी झाली आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोली येथून शिरूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी शिरूर येथे येत होते. बोऱ्हाडे मळा येथील हुंदाई शोरूम समोर शुभ्रा बोऱ्हाडे ही चार वर्षीय बालिका महामार्ग ओलांडत होती. एका कारच्या आडून ती अचानक आमदार कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कार (क्र. एमएच१२, एनएक्स १३९१) समोर आली.
चिमुकली गंभीर
कटके यांच्या चालकाने जोरदार ब्रेक दाबला परंतु गाडीच्या वेगामुळे शुभ्राला समोरासमोर जोराची धडक बसली. यात ती चेंडूसारखी उडून काही फुट अंतरावर डांबरी रस्त्यावर पडली. यात तिला गंभीर जखमी झाली. आमदार कटके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कारमधून खाली धाव घेत शुभ्रा हिला मदत करत उचलले आणि त्यांच्याच कारमधून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले.
Pune News: दहशत, भीती अन् धाकधूक! मुलींनी पुण्यात घराबाहेर पडायचं की नाही? ही एक घटना काय सांगते?