यशपाल सोनकांबळे, पुणे:
Raigad Bus Accident: पुण्यामधून एक भीषण दुर्घटनेची बातमी समोर आली आहे. राजगड किल्ल्याच्या पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या ट्रॅव्हल्सला रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. वेल्हा-खानापूर दरम्यान असलेल्या दुर्गम पाबे घाटात एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, १८ प्रवाशांना हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने सुखरूप बाहेर काढले आहे.
Sangli Crime: सिया-चेतन पेक्षाही डेंजर! लव्ह मॅरेज केलं त्यालाच छाताडावर बसून संपवलं, सांगलीत खळबळ
पर्यटकांची बस दरीत कोसळली
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी येथून २० पर्यटकांचा हा गट विकेंडची सुट्टी घालवण्यासाठी आणि ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी राजगडच्या दिशेने निघाला होता. पहाटे ६ च्या सुमारास पाबे घाटातील अवघड वळणावर ट्रॅव्हल्स आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. बसचे ब्रेक निकामी झाल्याचा किंवा चालकाचा अंदाज चुकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बस थेट दरीत कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाने युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवले. दरी खोल आणि दुर्गम असल्याने बचावकार्यात मोठी अडचण येत होती, तरीही जवानांनी अत्यंत कौशल्याने १८ प्रवाशांचे प्राण वाचवले. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घाटातील धोकादायक वळणांवर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world