देवा राखुंडे, पुणे:
Pune Bhigwan News: पुण्यामध्ये घडलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भिगवण बाजारपेठेतून मुलीचे आई अन् भावासमोर अपहरण करण्यात आले. या घटनेनंतर हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आज भिगवण बंदची हाक दिली आहे. त्याचबरोबर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पुणे सोलापूर महामार्गावर जाळपोळ करत रस्ता रोखून धरला. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या...
21 वर्षीय तरुणीचे अपहरण.. महामार्गावर जाळपोळ
सविस्तर वृत्त असे की, पुण्याच्या भिगवण बाजारपेठेतून मंगळवारी चारच्या सुमारास एका २१ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. या मुलीचे काही दिवसांनी लग्न होणार होते. मंगळवारी संबंधित मुलगी आई आणि भावासोबत भिगवण बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी आली होती. यावेळी जहीर हारुन शेख आणि आयन हारुन शेख यांनी त्यांची गाडी अडवली. मुलीचा भाऊ व आईच्या डोळ्ात चटणी फेकली आणि मारहाण केली. तसेच मुलीला घेऊन पसार झाले.
Pune News: पुणेकरांवर येणार पाणी संकट! पुणे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा, काय आहे प्रकरण?
ही घटना समजताच कुटुंबियांनी तात्काळ भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. संबंधित तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ सुत्रे हालवत जिल्ह्यात नाकाबंदी केली तसेच तपासासाठी काही पथकेही रवाना केली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कुटुंबियांनी तसेच ग्रामस्थांनी भिगवण पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता तसेच पुणे सोलापूर महामार्गावर जाळपोळ करीत मार्ग रोखून धरला.
आज भिगवण बंद
या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून आज भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्याचसोबतच हिंदू जनआक्रोश निषेध मोर्चा देखील काढला जाणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर या मोर्चाला संबोधन करणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world