Pune Crime: जागा दाखवण्यासाठी नेलं, तिथूनच उचललं, पुण्यात मेट्रो ठेकेदारासोबत भयंकर घडलं; 50 लाखांसाठी...

आरोपींनी  खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याची बतावणी करत ठेकेदाराचे अपहरण केले, तसेच त्यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागण्यात आली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे: 

Pune Crime News:  पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये 50 लाखाच्या खंडणीसाठी मेट्रो थेकेदाराचे अपहरण करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडला असून याप्रकरणी खराडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेले आरोपी खडी क्रशर (स्टोन क्रशर) चालक आहेत.

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! हायकोर्ट वकिलाची बीड बायपासवर निर्घृण हत्या

पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे अपहरण

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या ठेकेदाराचे अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गहुंजे भागात वास्तव्यास असलेले ४० वर्षीय फिर्यादी ठेकेदार मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूरचे आहेत.आरोपी झुरुंगे याच्याशी त्यांची ओळख झाली होती. ठेकेदाराने झुरुंगेकडून खडी खरेदी केली होती. आरोपींनी  खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याची बतावणी करत ठेकेदाराचे अपहरण केले, तसेच त्यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागण्यात आली. 

Advertisement

याप्रकरणी सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२), रूपेश शिवाजी गावडे (वय ३८, सर्व रा. लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता), प्रकाश बाळासाहेब राऊत (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मेट्रोतील ठेकेदाराने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आंबेडकर जयंतीदिनी गुंडांचा उच्छाद! 

दुसरीकडे, आंबेडकर जयंतीच्या दिवशी पुण्यामध्ये कुख्यात गुंडानी उच्छाद मांडल्याचं समोर आले आहे. शहरातील बिबेवाडी अप्पर शेळके वस्तीमध्ये  गुन्ह्यातून सुटून आलेल्या कुख्यात गुंडांनी मध्यरात्री धुडगूस घातला असून नागरिकांना अडवून शिवीगाळ तसेच विद्यार्थ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. यावेळी युवकांच्या दोन गटात हाणामारी झाली. या घटनांनी परिसरात दहशतीचं सावट कायम असून बिबवेवाडी पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात ओढावलं संकट; BMC मोठा निर्णय घेणार?