अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune News: बंगल्याच्या आवारामध्येच गांज्याची शेती करुन विक्री सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामधून समोर आला आहे. पुण्यातील लोहगाव परिसरातील एका बंगल्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून ४१ गांजाची झाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या कारवाईत ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गांजाची विक्री करण्यासाठी वापरले जाणारे ९ मोबाईल हस्तगत केले आहेत.
Bacchu Kadu: बच्चू कडूंचा 'घरवापसी'चा निर्णय! शिवसेनेत करणार प्रवेश
बंगल्याच्या आवारात गांजाची शेती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार आकाश मोरे आणि अमोल आदलिंग यांना पठारे वस्ती भागात एका बंगल्यात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी या बंगल्यात छापा टाकला. यावेळी हर्ष पांचाल ने हा बंगला भाडेतत्त्वावर घेतला असल्याचं समोर आलं. याच बंगल्याच्या आवारात त्याने गांजाची लागवड केल्याचे देखील उघड झाले.
बंगल्याच्या गार्डनमध्ये लहान-मोठी अशी तब्बल ४१ गांजाची झाडे पोलिसांना मिळून आली. या झाडांचे एकूण वजन साडेचार किलो इतके होते. इतकचं नाही तर आरोपीकडे असलेल्या वाहनातून सुद्धा गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी या बंगल्यातून नऊ मोबाईल हस्तगत केले आहेत. या प्रकरणी हर्ष पांचाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या मोबाइलद्वारे तो गांजाची विक्री करत होता का याचा अधिक तपास सुरू आहे.
नक्की वाचा- Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world