सुरज कसबे, पुणे:
Pune BJP Vs Congress Protest News: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका विधानाने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांचं कार्य समकक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केले होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. पुण्यामध्ये झालेल्या आंदोलनावेळी भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडाही झाला. या राड्यानंतर आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
काँग्रेस- भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल
हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी केलेले आंदोलन पुण्यातील काँग्रेस तसेच भाजप कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडले आहे. या आंदोलनानंतर पुण्यात भाजप तसेच काँग्रेसवर गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Pune Election: राज ठाकरेंचा मोठा निर्णय! पुण्यातील पराभव जिव्हारी लागल्याने यापुढे...
यामध्ये भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यासह 100 जणांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भाजपने दिलेल्या तक्रारीनंतर अरविंद शिंदे प्रशांत जगताप यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंदोलनावेळी दगडफेक अन् राडा भोवला
पुण्यामध्ये रविवारी झालेल्या या आंदोलनादरम्यान तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. भाजप नेते तसेच कार्यकर्त्यांकडून पुण्यातील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी काही आंदोलकांनी काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्ते आमने-सामने आले अन् मोठा तणाव निर्माण झाला. या आंदोलनादरम्यान दगडफेकही झाली ज्यामध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Pune News: पुण्यात भाजप-काँग्रेस आमनेसामने! आंदोलनावेळी दगडफेक, डोकी फोडल्याचा आरोप
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world