जाहिरात

Pune Election: राज ठाकरेंचा मोठा निर्णय! पुण्यातील पराभव जिव्हारी लागल्याने यापुढे...

राज ठाकरेंनी पुण्यातील नेते, पदाधिकाऱ्यांना चांगलेच झापले. निवडणुकीत सांगितलेल्या गोष्टी न केल्याने राज ठाकरेंनी नाराजी दर्शवल्याचेही सांगण्यात येत आहे. 

Pune Election: राज ठाकरेंचा मोठा निर्णय! पुण्यातील पराभव जिव्हारी लागल्याने यापुढे...

विशाल पाटील, प्रतिनिधी:

Raj Thackeray Pune MNS Meetting:  नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला दारुण पराभव स्विकारावा लागला. २९ महानगरपालिकांपैकी तब्बल 22 ठिकाणी राज ठाकरेंच्या मनसेला खातेही उघडता आले नाही. विशेषत: कधीकाळी 29 नगरसेवक असलेल्या पुणे महानगरपालिकेत एकही जागा मनसेने जिंकली नाही. पुण्यामध्ये झालेल्या या मोठ्या पराभवानंतर राज ठाकरेंनी आता सर्वात मोठा अन् महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना झापलं..

महापालिका निवडणुकांमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. रविवारी पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पुण्यातील नेते, पदाधिकाऱ्यांना चांगलेच झापले. निवडणुकीत सांगितलेल्या गोष्टी न केल्याने राज ठाकरेंनी नाराजी दर्शवल्याचेही सांगण्यात येत आहे. 

Maharashta Election 2026 : राज ठाकरेंच्या पदरी 22 शून्य ! मनसेचा मोठा पराभव, मुंबईतही 'ठाकरे ब्रँड ' फेल

यासोबतच राज ठाकरेंनी या बैठकीमध्ये पुण्यामध्ये पुन्हा पक्षाची बांधणी करण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या पुढे दर आठवड्याला स्वत: राज ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत. दर आठवड्याला राज ठाकरे स्वतः कारभाराची हजेरी घेणार असल्याने पुण्यातील मनसे नेत्यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. 

पराभवातून बाहेर पडा, कामाला लागा..

यावेळी राज ठाकरेंनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना नव्याने सुरुवात करण्यासही सांगितले. पराभवातून बाहेर पडत कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच येणाऱ्या काळात काम करत रहा, कुठेही कमी पडू नका. पुण्यात प्रत्येक घरापर्यंत पोहोचा, असा सल्लाही त्यांनी पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना दिला आहे. 

दरम्यान, पुणे महानगरपालिकेत कधीकाळी मनसेचे तब्बल 29 नगरसेवक होते. मात्र या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही. विशेष म्हणजे पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यासोबतच नाशिकमध्येही कधीकाळी सत्तेत असलेल्या मनसेला अवघी एक जागा मिळाली. 

Gram Panchayat News: राज्यातील सर्व ग्रामपंचायती राहणार बंद! गावगाड्याचा कारभार होणार ठप्प; कधी अन् कारण काय?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com