Pune Ganoshotsav: गणेश भक्तांसाठी सुरक्षा कवच! दगडूशेठ गणेश मंडळाकडून 50 कोटींचा विमा

पुण्यातील प्रसिद्ध  दगडूशेठ गणेश मंडळाकडून ५० कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे. या विम्यामुळे चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला झाल्यास मिळेल सुरक्षा कवच मिळणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Ganeshotsav 2025: गणपती बाप्पाचा आगमन सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. या गणपती सोहळ्याआधी पुण्यातील प्रसिद्ध  दगडूशेठ गणेश मंडळाकडून ५० कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे. या विम्यामुळे चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला झाल्यास मिळेल सुरक्षा कवच मिळणार आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  पुणे शहर मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यासह कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीअंतर्गत गणेशभक्तांचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास प्रति व्यक्तीला ५ लाख रुपये, अपघातात अंशतः अपंगत्व आल्यास २ लाख आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. उत्सवकाळात ही विम्याची सुविधा असेल.

Pune Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाआधी पुणेकरांसाठी Good News! अजित पवारांकडून मोठ्या घोषणा

पुणे पोलिसांकडून शहरातील मध्यवर्ती भागात CCTV, वीज आणि रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी जोरदार प्लॅनिंग करण्यात आले आहे. पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या तयारीसाठी शहरातल्या मध्यवर्ती भागात पोलिसांची 11 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.  पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या 11 पथकांद्वारे मध्यवर्ती भागात कामे सुरू असून गणेश उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांकडून रस्त्यावर उतरत वेगवेगळी कामे करण्यात येत आहेत. 

तर गणेशोत्सवा दरम्यान शहरात होणाऱ्या गर्दीसाठी देखील पुणे पोलिसांचे खास प्लॅनिंग करण्यात आले आहे. गणेशोत्सवा दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास होऊ नये म्हणून पुणे पोलिसांची एक टीम रस्त्यावरील खड्ड्यांच्या पडताळणीसाठी तैनात करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या या टीमकडून रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो काढत पुणे महानगरपालिकेला पाठवण्यात येत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या या फोटोंच्या आधारे पुणे महापालिकेकडून रस्ता दुरुस्तीसाठी तातडीने कामे सुरू आहेत. 

Advertisement

कसबा हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती का? 132 वर्षांपासून सुरु असलेल्या परंपरेचा वाचा अर्थ