जाहिरात

Hinjewadi IT Park: हिंजवडी IT पार्कबाबत सरकारचा ॲक्शन प्लॅन, CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis On Hinjewadi IT Park Development: आयटी पार्कच्या एन्ट्री पॉइंटवरील ट्रॅफिक समस्या दूर करण्यासाठी सुधारणा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले.

Hinjewadi IT Park: हिंजवडी IT पार्कबाबत सरकारचा ॲक्शन प्लॅन, CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अविनाश पवार, पुणे:

Hinjewadi IT Park Development Meeting: हिंजवडीसह (Hinjewadi IT Park) सात गावांचा समावेश करण्यासाठी आयटी पार्क शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधीही हजर होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्ते, ट्रॅफिक आणि मेट्रो समस्यांच्या सोडवणुकीचे आश्वासन दिले. 

Hinjewadi News: हिंजवडी IT पार्कचा पालिकेत समावेश करा..', नागरिकांसह आयटीयन्सचे आंदोलन

हिंजवडीसह सात गावांचा पीसीएमसीमध्ये समावेश व्हावा, यासाठी आयटी पार्कमधील शिष्टमंडळाने आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. बैठकीत लक्ष्मी चौकाचा रस्ता चार लेनवरून सहा लेनपर्यंत वाढवण्याचे निर्देश देण्यात आले असून, आयटी पार्कच्या एन्ट्री पॉइंटवरील ट्रॅफिक समस्या दूर करण्यासाठी सुधारणा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले.

गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतींकडून आयटी पार्कच्या सुविधांकडे दुर्लक्ष झाले असल्याची टिपणीही मुख्यमंत्र्यांनी केली. आयटी पार्कमधील समस्यांवर युद्धपातळीवर काम सुरू केले जाईल, तसेच मेट्रो संदर्भातील अडचणी दूर करण्याचे आश्वासनही बैठकीत देण्यात आले.

Hinjewadi Water Crisis: हिंजवडी आयटी पार्कचे 'वॉटर पार्क' का होते? जलकोंडीची मानवनिर्मित कारणे समोर

यामुळे आयटी पार्कच्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आल्याचे मत सचिन लोंढे यांनी व्यक्त केले. पावसाळ्यातील खड्डे, ट्रॅफिक आणि मूलभूत सुविधांच्या समस्यांवर एनडीटीव्ही मराठी ने वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर आता त्याला यश मिळाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com