जाहिरात

Pune Bridge Collapse: झेडपी, PWDचा हलगर्जीपणा नडला! कुंडमळा पूल दुर्घटनेचा धक्कादायक अहवाल समोर

Pune Indrayani River Bridge Collapse Reason: पुणे जिल्हा परिषदेचे (ZP) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरण्यात आले असले तरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मात्र दाखल करण्यात आलेला नाही. 

Pune Bridge Collapse: झेडपी, PWDचा हलगर्जीपणा नडला! कुंडमळा पूल दुर्घटनेचा धक्कादायक अहवाल समोर

Pune Indrayani River Bridge Collapse: पुण्यातील मावळमध्ये कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. 15 जून रोजी या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता तर 30 जण किरकोळ जखमी झाले होते. या दुर्घटनेची जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता समोर आली असून  पुणे जिल्हा परिषदेचे (ZP) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) जबाबदारी झटकणे व देखभाल न करणे हे ठपके लावले आहेत. 

कुंडमळा पूल दुर्घटनेत चौकशी अहवालाने झेडपी व पीडब्ल्यूडीचा हलगर्जीपणा उघड केला आहे. पूल कोसळण्यामागे देखभाल नसल्याचा ठपका आहे. १९९२ साली बांधलेला हा पूल देखरेख अभावी वेळीच निकामी झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. या पूल दुर्घटनेसाठी पुणे जिल्हा परिषदेचे (ZP) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरण्यात आले असले तरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मात्र दाखल करण्यात आलेला नाही. 

Pune Bridge Collapsed: कुंडमळा येथील बचावकार्य थांबले, 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

कुंड मळा पूल दुर्घटनेची जबाबदारी कुणाची?

 • या पूलाचे बांधकाम पीडब्ल्यूडीने केले होते.

 • हा पूल जिल्हा परिषदेच्या रस्त्याला संरक्षण दलाच्या रस्त्याशी जोडतो.

 • झेडपीकडे पूल अधिकृतपणे हस्तांतरीत करण्यात आलेला नव्हता.

 • परिणामी हा पूल ‘कोणाचाही' राहिला नाही.

• शासन निर्णयानुसार झेडपीने देखभाल करणे अपेक्षित होते, मात्र हस्तांतरणाचा अभाव आणि जबाबदारी ठरविण्यात आलेल्या गोंधळामुळे दुर्लक्ष झाले.

पूल वापरात नव्हता आणि तो पोलिस व प्रशासनाच्या देखरेखीखाली होता. परंतु पर्यटकांचा अचानक मोठा ओघ झाल्यामुळे ही दुर्घटना घडली, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Pune Bridge Collapsed : पूल अपघातातील मृतांचा आकडा वाढला, अपघातापूर्वीच ग्रामस्थांनी पोलिसांना केला होता फोन

पुलाच्या दुर्घटनेनंतर करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पुणे जिल्ह्यातील ६३ पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले असून पावसाळ्यानंतर हे पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. त्यांच्या पाडकामाचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, अद्याप याबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नसल्याने जीव गेलेल्यांना न्याय कधी मिळणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com