How to Register Vehilcle With Rapido: तुम्हीही पार्ट टाईम किंवा फुल टाईम कामाच्या शोधात आहात.. पैसे कमावण्यासाठी आयडिया शोधत आहात? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. तुमच्याकडे जर फक्त बाईक असेल तर तुम्ही रॅपिडो किंवा उबेर बाईक राईडच्या सर्विसमधून महिन्याला 30, 0000 रुपये कमाई करु शकता.
दुसरी नोकरी करुन चार ते पाच तास हे काम करुनही तुम्ही चांगली कमाई करु शकता. या रॅपिडो बाईकसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे? त्यामध्ये पैसे कसे मिळतात? किती कमाई होऊ शकते? जाणून घ्या याबाबतची सर्व माहिती.
रॅपिडो रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक बाबी:
- अँड्रॉइड फोन.
- 2009 किंवा त्यानंतर बनवलेली बाईक.
- वैध चालक परवाना.
- दुचाकी नोंदणी प्रमाणपत्र (आरसी).
- चालक आणि प्रवाशासाठी हेल्मेट
अर्रर्रर्र! तीर्थ म्हणून अख्ख्या ऑफिसला पाजलं असं काही, सगळ्यांचीच पळापळ, VIDEO व्हायरल
रॅपिडोसाठी रजिस्ट्रेशन कसे कराल? Rapido Bike Registration Step by Step Process
- 'रॅपिडो कॅप्टन अॅप' डाउनलोड करा
- अॅप उघडा आणि “सुरू करा” (Get Started) वर टॅप करा.
- तुम्हाला सोयीस्कर वाटणारी भाषा निवडा.
- नोंदणी करा किंवा लॉग इन करा, तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर तुमचा मोबाईल नंबर द्या आणि पासवर्ड तयार करा.तुमचे आधीच खाते असल्यास, तुमच्या क्रेडेन्शियल्ससह (Credentials) लॉग इन करा.
- OTP एंटर करा
- तुमचे शहर निवडा आणि सेवा निश्चित करा
- तुम्हाला कोणत्या प्रकारची सेवा द्यायची आहे, ते निवडा (उदा. बाईक राईड्स).
- तुमची वैयक्तिक माहिती आणि फोटो भरा
- स्वतःचा एक स्पष्ट फोटो अपलोड करा.
- तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर आणि त्याची मुदत संपण्याची तारीख एंटर करा.
- आरसी बुक आणि पॅन कार्डाचे तपशील अपलोड करा.
- प्रोफाइल पडताळणी: एकदा तुम्ही सर्व आवश्यक तपशील आणि कागदपत्रे अपलोड केल्यावर, तुमची माहिती पडताळणीसाठी जाईल. साधारणपणे 1 ते 2 दिवसांत पडताळणी पूर्ण होते आणि तुमचे खाते सक्रिय होते.
VIDEO: तब्बल 21 कोटींची म्हैस, प्रदर्शनात कोसळली अन् जीव सोडला; नेटकरी संतापले, पण...
रॅपिडो राईडला किती पैसे मिळतात?
रॅपिडो राईडरसाठी निश्चित दर नसतात. राईडच्या अंतरावरुन ते ठरवले जाते. म्हणजेच जर एखाद्या 1 किलोमीटरच्या राइडसाठी ग्राहक 30 रुपये देत असेल, तर त्यातून कंपनीचे कमिशन कापून रायडरला साधारणपणे 17 पर्यंत मिळतात.
साधारणपणे 100 च्या राइडवर रायडरला 70 ते 80 मिळतात. याचा अर्थ कंपनी २०% ते ३०% कमिशन किंवा सेवा शुल्क कापते. पूर्ण वेळ काम करणारा राईडर २०-३० राईड्स पूर्ण करतो. ज्याचे त्याला दिवसाला 1000 पर्यंत पैसे मिळू शकतात. म्हणजेच महिन्याला 30000 पर्यंत कमाई होऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world