Latur-Hadapsar train : ट्रेनमधील प्रवास करताना अनेकदा महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जाते. मोबाइलचा उपयोग नको त्या गोष्टींसाठी केला जात असल्यानं अनेकदा समोर आलं आहे, दरम्यान लातूर-हडपसर ट्रेनमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ट्रेनमधील तरुणाने संतापजनक कृत्य केलं आहे. या घटनेचे व्हिडिओदेखील समोर आले आहे. (Secretly filmed videos of women)
shahaanpana नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तीन व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनमधील महिलांचे व्हिडिओ मोबाइलमध्ये शूट केल्याप्रकरणी तरुणाला जाब विचारला जात आहे. दरम्यान तरीही तरुण अरेरावीची भाषा करीत होता. मी कोणाचेही व्हिडिओ काढू शकतो असं तो तरुण म्हणत होता. विशेष म्हणजे त्याने हे व्हिडिओ मोबाइलमध्ये लॉक करून ठेवले होते.
नक्की वाचा - रोहित शर्माने हरमनप्रीतला शिकवली होती ट्रॉफी उचलण्याची योग्य पद्धत? VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Video पाहण्यासाठी क्लिक करा...
या व्हिडिओनुसार, तरुण आपला मोबाइल दाखविण्यास तयार नव्हता. मी व्हिडिओ डिलिट केल्याचं त्याने सुरुवातील सांगितलं, मात्र मोबाइल तपासल्यानंतर त्याने महिलांचे व्हिडिओ दुसऱ्या फोल्डरमध्ये लॉक करून ठेवले होते. त्या डब्यातील प्रवाशांनी याचा जाब विचारल्यानंतरही तरुणाच्या चेहऱ्यावर अजिबातच लाज दिसत नव्हती. शेवटी सहप्रवाशांनी त्याला जबर चोप दिला.
(व्हिडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)
शहाणपण या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील माहितीनुसार, हा व्हिडिओ लातूर हडपसर ट्रेनमधील आहे. हा तरुण महिलांचे लपून व्हिडिओ काढत होता. ही बाब सह प्रवासांच्या लक्षात येताच त्यांनी जाब विचारला. तर तरुण यावर उलट उत्तरं देऊ लागला. अखेर सह प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
