सूरज कसबे/ पुणे
कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटामध्ये मंगळवारी (11 जून) रात्री जोरदार झालेल्या पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये महामार्गावरून जाणाऱ्या रिक्षेवर दरड कोसळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
(नक्की वाचा: 'NDTV मराठी'चा इम्पॅक्ट; कोस्टल रोडवरील प्रवाशांचा तो संभ्रम दूर)
मुंबईतील रहिवासी असणारे भालेकर कुटुंब मंगळवारी रात्री मुलुंडहून चंदनापुरी संगमनेर या त्यांच्या मूळ गावी रिक्षेने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माळशेज घाटातील बोगद्याजवळ महादेवाच्या मंदिर परिसरात हा अपघात झाला आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामध्ये डोंगरावरील मलबा भालेकर कुटुंबीयांच्या रिक्षेवर पडला. या अपघातात चालक राहुल भालेराव आणि त्यांचा सात वर्षांचा पुतण्या स्वयम भालेरावचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षेतील अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
(नक्की वाचा: रत्नागिरीच्या खेडमध्ये दरड कोसळली, रस्त्यावर 'लाल चिखल')
यापूर्वीही पावसाळ्यामध्ये माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. प्रवाशांनी या मार्गावरून रात्रीच्या वेळेस प्रवास करणे टाळावे, असे आवाहनही महामार्ग पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
(नक्की वाचा: VIRAL VIDEO: पैसे मागितले म्हणून जेसीबीचा चालकाची सटकली; टोल नाक्याची केली तोडफोड)
Indigo Airlines | विमान हैद्राबादला, प्रवाशांचं सामान नाशिकलाच; इंडिगो एअरलाईन्सचा गलथान कारभार पाहा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world