Pune News : पुणेकरांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली पुल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणखी एक निर्णय घेतला आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र रोखण्यासाठी वाकड ते मामुर्डी या पट्ट्यात तब्बल ८ नवीन भुयारी मार्ग (Underpasses) उभारण्यात येणार आहे. या भुयारी मार्गामुळे पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.
वाहतूक कोंडी आणि अपघातांचं सत्र...
गेल्या काही वर्षांमध्ये वाकड, पुनावळे, ताथवडे आणि मामुर्डी हे भाग जलद गतीने वाढले आहेत. आयटी पार्क आणि शैक्षणिक संस्थांमुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. महामार्ग ओलांडताना पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना त्रास होतो. ज्यामुळे या भागात वारंवार वाहतूक विस्कळीत होत होती.
वाकड ते मामुर्डी दरम्यान ८ भुयारी मार्ग कसा असेल? l Wakad and Mamurdi 8 Underpasses
१. हे भुयारी मार्ग वाकड, ताथवडे आणि मामुर्डी यांसारख्या महत्त्वाच्या चौकांमध्ये
२. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना जोडणारे हे मार्ग असल्यामुळे 'यू-टर्न' घेण्यासाठी वाहनचालकांना आता लांबपर्यंत जावे लागणार नाही.
३. Service Roads वरील ताण कमी होऊन इंधन आणि वेळेची मोठी बचत होईल.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि बंगळुरू महामार्ग यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असल्याने येथे नेहमीच अवजड वाहनांची रांग लागलेली असते. नवीन भुयारी मार्गांमुळे स्थानिक वाहतूक आणि हायवेची वेगवान वाहतूक वेगळी होईल. यामुळे अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे.
NHAI कडून या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे असून यामुळे हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world