जाहिरात

Traffic Jam: इंटरव्ह्यू राहिला, ऑफिस बुडाले, अन्न- पाण्याविना 26 तास ट्रॅफिकमध्ये, बस प्रवाशाचा भयंकर अनुभव

वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना अक्षरश: अन्न पाण्याविना रात्र काढावी लागली. या महाकोंडीत अडकलेल्या मुंबईतील एका प्रवाशानेही तब्बल 26 तासांचा आपला अनुभव कथन केला आहे. 

Traffic Jam: इंटरव्ह्यू राहिला, ऑफिस बुडाले, अन्न- पाण्याविना 26 तास ट्रॅफिकमध्ये, बस प्रवाशाचा भयंकर अनुभव
  • मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर तब्बल 33 तास अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली, ज्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला
  • काही प्रवाशांना विमान पकडायचे, ऑफिस गाठायचे तसेच मुलाखतीसाठी वेळेवर पोहोचायचे होते, मात्र वाहतूक ठप्प झाली
  • एका प्रवाशाने या महाकोंडीतील 26 तासांचा अनुभव सांगितला, ज्यात गाडी लोणावळ्यात अडकून पडली होती
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Mumbai Pune Expressway Traffic Jam Issue: मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर तब्बल 33 तास अभूतपुर्व अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कुणाला विमान पकडायचे होते, कुणाला ऑफिस गाठायचे होते तर कुणाला इंटरव्युव्ह द्यायचा होता, मात्र वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना अक्षरश: अन्न पाण्याविना रात्र काढावी लागली. या महाकोंडीत तब्बल 26 तास अडकलेले बस प्रवासी तानाजी कदम यांनीही आपला थरारक अनुभव कथन केला आहे. 

वाहतूक कोंडीतले थरारक 26 तास...!

तानाजी कदम यांनी सांगितले की, 'मी मंगळवारी रात्री 8 वाजता साताऱ्यातून मुंबईकडे निघालो. बुधवारी सकाळी 11वाजता कामावर पोहचण्याच्या उद्धेश्याने माझा हा प्रवास होता. रात्री जेवणानंतर प्रवास सुरु झाला अन् बससमधील आम्ही सर्वच प्रवासी झोपलो. पहाटे पाचच्या सुमारास जाग आली. जाग आल्यानंतर समजले की गाडी अजून लोणावळ्यामध्येच आहे. लोणावळ्यातुन गाड्या पुढे सरकातच नव्हत्या. सकाळी सातच्या सुमारास गाड्या थोडं पुढे सरकल्या आणि आम्ही घाटात चांगलेच अडकलो.'

Raj Thackeray: 'प्रवाशांचा टोल परत करा', एक्स्प्रेसवे जाम, राज ठाकरे संतापले! म्हणाले, 'कोडगेपणा अनाकलनीय'

'रात्रभरापासून प्रवास करणारी लोक 10-11 वाजचा एकमेकांशी बोलू लागले. यामध्ये कुणाला कामावर पोहोचायचे होते. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेला जायचे होते. एका मुलीला तर सरकारी नोकरीसाठी मुलाखत होती तिला ११ वाजता पोहोचायचे होते मात्र या वाहतुक कोंडीने तिचाही खोळंबा केला. मुलाखतीला पोहोचता येत नसल्याने ती अक्षरश: रडत होती'

अन्नपाण्याविना हाल...

'माझ्याच बसमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी होत्या, त्यांना सुद्धा ड्युटीवर जायचे होते. घाटात खाण्या-पिण्याची कसलीच व्यवस्था नव्हती. लोक प्रवासात स्वतःसाठी आणलेल्या खाण्याचे पदार्थ एकमेकांना शेअर करत होते. दुपारनंतर ट्रकवाल्यांनी तर रस्त्यात चूल मांडली अन् आपला स्वयपाक आपणच करायला सुरुवात केली. या कोंडीमुळे वयस्कर नागरिक तसेच लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. स्त्रियांना वॉशरुम, शौचालयाची सोय नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. संध्याकाळी सात वाजता संथ गतीने एक लेन वाहतूक सुरु झाली अन् आम्ही ज्या ठिकाणी टँकर उलटला होता त्या ठिकाणाहून पुढे सरकू लागलो. तब्बल 26 तासानंतर मी रात्री 10.15 ला प्रभादेवीला पोहोचलो'

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानातून आणखी एक नेता जाणार होता, उशीर झाल्याने बचावला

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com