जाहिरात

Heatwave: सावधान! पुणे मुंबईसह राज्याचा पारा 40 पार; उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये?

Heatwave Alert: राज्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. उष्माघाताची लक्षणे, त्यावरील प्रथमोपचार आणि उन्हापासून संरक्षणासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना सविस्तर जाणून घेऊया...

Heatwave: सावधान! पुणे मुंबईसह राज्याचा पारा 40 पार; उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये?
"Heatwave Alert: उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे?"
Canva

Heatwave Alert: राज्यात सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढू लागला असून तापमानाचा पारा चाळीशी पार करू लागला आहे. अशा कडक उन्हात आरोग्याकडे थोडेही दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. विशेषतः उष्माघात (Heatstroke) ही एक गंभीर समस्या म्हणून समोर येत असून, त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, चक्कर येणे, मळमळणे आणि थकवा जाणवणे यासारख्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे. उन्हाळ्यात स्वतःचे संरक्षण कसे करावे, उष्माघाताची लक्षणे कशी ओळखावी आणि तातडीने कोणते प्रथमोपचार करावे, याची सविस्तर माहिती प्रत्येकाने जाणून घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे.

उष्णतेचा शरीरावर होणारा परिणाम | Effects Of Heat On The Body

  • सामान्य तापमान: मानवी शरीराचे तापमान 36.4°C ते 37.2°C (97.5°F ते 98.9°F) असते.
  • सौम्य लक्षणे: अंगावर पुरळ (घामेळी), हात-पाय आणि घोट्याला सूज येणे, स्नायूंमध्ये पेटके येणे.
  • गंभीर परिणाम: उष्माघात, गोंधळल्यासारखे वाटणे, हृदय, श्वसन आणि किडनीच्या जुन्या आजारांवरील ताण वाढणे.
  • इतर लक्षणे: चक्कर येणे, मळमळ, उलट्या, अति तहान लागणे, जलद श्वासोच्छवास, लघवीचे प्रमाण कमी होणे (गडद पिवळी लघवी) इत्यादी

(नक्की वाचा: Kidney Failure: तुमची किडनी नीट काम करत नाहीय, हे तुम्हाला कसं कळेल? किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षण काय आहेत?)

उष्माघाताची प्रमुख लक्षणे | Heatwave Symptoms 

प्रौढांमधील लक्षणे

  • डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे आणि बेशुद्ध पडणे, अशक्तपणा जाणवणे.
  • शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे यासह प्रौढ व्यक्तिंमध्ये दिशाभूल.
  • गोंधळासह बदललेली मानसिक संवेदना आणि चिडचिड, अ‍ॅटॅक्सिया.
  • फेफरे किंवा कोमामध्ये जाणे, गरम, लाल आणि कोरडी त्वचा, शरीराचे तापमान 40°C किंवा 104°F, डोकेदुखी  

उष्माघाताची मुलांमधील लक्षणे 

  • आहार घेण्यास नकार, अति चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी, तोंड कोरडे पडणे.
  • शुष्क त्वचा आणि अश्रू न येणे / खोल गेलेले डोळे, सुस्ती/बदललेल्या संवेदना
  • चिंता, चक्कर येणे, मूर्च्छा येणे आणि डोके हलके होणे, जखडणे.
  • शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव, स्रायू कमकुवत होणे किंवा पेटके येणे.
  • मळमळ आणि उलटी, जलद हृदयाचे ठोके / श्वास घेण्यास त्रास होणे.
उष्माघात झाल्यास काय करावे? (प्रथमोपचार) | Heatwave Alert | Heatstroke Symptoms Precautions
  • त्वरित हालचाल: संबंधित व्यक्तीला लगेच सावलीत किंवा थंड ठिकाणी न्यावे.
  • थंड पाण्याचा वापर: शरीराच्या जास्तीत जास्त भागावर थंड पाण्याचा मारा करावा किंवा ओल्या पट्ट्या ठेवाव्यात.
  • हवा: पंख्याचा वापर करावा किंवा वारा घालावा.
  • पेय: व्यक्ती शुद्धीवर असल्यास पाणी, लिंबू सरबत किंवा पन्हे पाजावे. (बेशुद्ध असल्यास काहीही भरवू नका).
  • झोपवण्याची पद्धत: व्यक्तीला सपाट जागी झोपवून कपडे सैल करावे. पाय थोडे उंचावर ठेवावेत.
  • वैद्यकीय मदत: त्रास जास्त असल्यास तात्काळ 108/102 क्रमांकावर संपर्क साधावा.
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये? | Heatstroke  Do's And Don'ts List

काय करावे? (Do's)

  • हायड्रेशन: तहान लागली नसली तरीही भरपूर पाणी प्या. सोबत नेहमी पाणी ठेवा.
  • पेय: ओ.आर.एस (ORS), ताक, लस्सी, लिंबू पाणी, कैरीचे पन्हे, कोशिंबीर याचा डाएटमध्ये समावेश करावा. 
  • आहार: भरपूर ताजे, हलके अन्न आणि फळे (टरबूज, खरबूज, संत्री, काकडी) खा.थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्यावा. 
  • पोशाख: पातळ, सैल आणि फिकट रंगाचे सुती कपडे वापरा.
  • संरक्षण: बाहेर जाताना छत्री, टोपी, शूज किंवा चप्पल याचा वापर करा.
  • नियोजन: कष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी थंड वेळेत करा. भरपूर ताजे आणि हलके अन्न खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडावे. 
काय करू नये? (Don'ts)
  • वेळ: दुपारी 12 वाजेपासून ते 3 वाजेदरम्यान उन्हात बाहेर पडणे टाळा.
  • पेय: मद्यपान, चहा, कॉफी आणि जास्त साखर असलेली शीतपेये टाळा (यामुळे शरीरातील पाणी कमी होते).
  • अन्न: रिकाम्या पोटी बाहेर पडू नका. तिखट, मसालेदार आणि शिळे अन्न टाळा.
  • वाहन: पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नका.
  • बदल: एअर कंडिशनमधून थेट कडक उन्हात बाहेर पडणे टाळा. थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटांना अडथळा निर्माण करावा. 
    शक्यतो तुमच्या घराच्या ऊन येणाऱ्या बाजूच्या खिडक्या आणि पडदे दिवसा बंद ठेवा, रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडाव्या. 
    दिवसाच्या थंड वेळेमध्ये बाहेरच्या कामांचे वेळापत्रक किंवा नियोजन करावे.

(नक्की वाचा: What Not To Eat With Alcohol : दारूसोबत चुकूनही या गोष्टींचे करू नका सेवन, अन्यथा होतील हे गंभीर परिणाम)

विशेष लक्ष द्या: लहान मुले, गर्भवती महिला, घराबाहेर काम करणारे मजूर आणि हृदयरोगी यांनी उन्हाळ्यात अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे.

डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले की, उन्हाळ्यात बाहेर फिरायला जाताना पिण्याचे पाणी, ज्युससोबत ठेवा आणि शरीर हायड्रेटेड राहील याबाबत दक्षता घ्या. पातळ, सैल सुती कपडे परिधान करा. सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी छत्री, टोपी आदींनी आपले डोके झाका. अनवाणी बाहेर जाऊ नका,  स्वतःची काळजी घ्या. अधिक माहितीसाठी नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com