अविनाश पवार, पुणे:
Pune Municiple Corporation Election 2026: राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उप मुख्यमंत्र्यांसह सर्वच बडे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यामधील प्रभाग क्र. ९ मधील अधिकृत उमेदवार श्री. अमोल रतन बालवडकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी थेट पुण्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांवक जोरदार टीका केली.
काय म्हणाले अजित पवार?
"35 वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक निवडणुका पहिल्या. केंद्रात आणि राज्यात आम्ही महायुती आहोत पण पुणे - पिंपरीमध्ये वेगळे चित्र आहे. ज्या कारभाऱ्याच्या हातात पुणे महापालिकेची सूत्र आहेत. इथल्या त्रिमुर्तींचा दोष आहे. ट्रॅफिकच्या समस्याला जबाबदार कोण? आहे," असे सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला.
Dhule Crime: लाठ्याकाठ्या तलवारीने हल्ला, गोळीबार... शीख बांधवांमध्ये तुफान राडा, धुळ्यात खळबळ
"लाडक्या बहिणींना पैसे देतो उपकार करत नाही. मी कामाचा माणूस आहे, शब्दाचा पक्का आहे. मी पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी पार पाडतोय. महापालिकेला वेगळे अधिकार आहेत. केंद्राने राज्याने भरभरून दिले, कारभारी कमी पडले. मला कारभारी करा मी शब्द देतो नाही चेहरामोहरा बदलला तर बघा. पुणे तुमचं आमचं आहे, बाहेरची लोक येतील आणि जातील. आपली माणस ओळखा आपली लोक पहा," असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
भाजप नेत्यांवर निशाणा...
"पुणे खड्ड्यात गेलं त्याला जबाबदार कोण? केंद्रात राज्यात चांगली लोक आहेत पण इथले लोक चांगली नाहीत. आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर काम करणारे आहोत, आम्ही जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करू शकत नाही. अमोल बालवडकरची काय चूक आहे. त्यांनी जीवाचं रान केल पक्ष वाढवण्यासाठी आणि तुम्ही त्यांना बाजूला केले. जो अपमान अमोलचा केलाय त्याचा बदला 15 तारखेला घ्यायचा आहे. काय काय लोकांच्या डोक्यात सत्ता गेलीय ती आपल्याला बाहेर काढायची आहे," असा घणाघातही अजित पवार यांनी केला.
नक्की वाचा >> पुण्यातून अल्पवयीन मुलीला पळवलं..पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी इन्स्टाग्रामच्या एका 'क्लू'मुळे सापडला!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world