
Pune Private RO Project : पुणे शहरात GBS रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत सिंहगड रोड, किरकटवाडी आणि इतर परिसरात पाण्याच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये खाजगी आरओ प्रकल्पांचा पण समावेश होता आणि त्या चाचणीच्या अहवालात या प्रकल्पातून पाणी पुरवले जात होते. ते ही पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या पार्श्वभूमीवर तब्बल 55 खाजगी आरओ प्रकल्पांना टाळे ठोकण्यात आले आहे. शहरातील अनेक भागात पाणी पुरवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने या खाजगी आरओ प्रकल्पांसाठी नियमावली काढली आहे.
नक्की वाचा - GBS चा धोका अन् पुणेकरांच्या आरोग्याशी हेळसांड; खडकवासलाचं धक्कादायक सत्य समोर
नेमकी काय आहे खाजगी आरओ प्रकल्पांसाठी नियमावली?
- प्रत्येक प्रकल्पाने महानगरपालिकेकडे नोंदणी करून घ्यावी.
- आरओ प्रकल्प योग्य असल्याचा दाखला मूळ उत्पादक किंवा देखभाल दुरुस्ती करणाऱ्या संस्थेकडून घेणे.
- प्रकल्पातील पाणी जागतिक आरोग्य संस्थेच्या आयएस 10,500 नुसार शुद्धीकरण केल्याचा दाखला देणे बंधनकारक
- राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे महानगरपालिका प्रयोगशाळेकडून वारंवार पाणी पिण्यास योग्य आहे का याची चाचणी करून अहवाल पालिकेकडे सादर करण्यात यावा.
- ज्या प्रकल्पात पुणे महानगरपालिकेचे पाणी वापरण्यात येते त्यांनी नळजोड करून बिगरघरगुती दराने मीटर प्रमाणे बिल जमा करावे.
- संबधित क्षेत्रीय कार्यालयातून आरोग्य अधिकारी यांनी या पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी.
- तपासणीमध्ये पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले तर प्रकल्प बंद करायची करवाई देखील करण्यात यावी.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world