जाहिरात

GBS चा धोका अन् पुणेकरांच्या आरोग्याशी हेळसांड; खडकवासलाचं धक्कादायक सत्य समोर

पुण्यात Guillain-Barre Syndrome (GBS) चे रुग्ण वाढत असताना स्टिंग ऑपरेशनमध्ये हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

GBS चा धोका अन् पुणेकरांच्या आरोग्याशी हेळसांड; खडकवासलाचं धक्कादायक सत्य समोर

Khadakwasla dam contaminated water : गुईलेन बॅरे सिंड्रोममुळे (Guillain-Barre Syndrome) पुण्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 172 जणांना जीबीएसची लागण झाली आहे. वाढत्या जीबीएसच्या रुग्णांमुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य प्रयोगशाळेच्या तपासात पुण्यातील आठ पाणीपुरवटा स्त्रोतांमध्ये प्रदूषण असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील वाढत्या जीबीएसबाबत एक मोठी माहिती समोर आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक धरण म्हणजे खडवासला. या धरणातच दूषित पाणी सोडलं जात असल्याचं उघड झालं आहे. NDTV मराठीने याचं ग्राऊंड रिपोर्टिंग केलं तेव्हा धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं. विविध हॉटेल, खासगी कंपन्यांसह The Defence Institute of Advanced Technology (DIAT) या सरकारी कंपनीतूनही खडवासला धरणात दूषित पाणी सोडलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. 

Pune Cafe : पुण्यातील प्रसिद्ध कॅफेमध्ये चॉकलेटच्या नावाखाली 'उंदीर शेक'ची डिलिव्हरी, विद्यार्थ्याची रुग्णालयात धाव! 

नक्की वाचा - Pune Cafe : पुण्यातील प्रसिद्ध कॅफेमध्ये चॉकलेटच्या नावाखाली 'उंदीर शेक'ची डिलिव्हरी, विद्यार्थ्याची रुग्णालयात धाव! 

पुण्यात Guillain-Barre Syndrome (GBS) चे रुग्ण वाढत असताना स्टिंग ऑपरेशनमध्ये हा धक्कादायक खुलासा झाला आहे. खडकवासला धरणाच्या जवळील दुकाने आणि संरक्षण संस्थेच्या (DIAT) परिसरातून दूषित पाणी थेट धरणात सोडले जात आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. या घाणीमुळे खडकवासला धरणाचं पाणी दूषित होत आहे. या गंभीर समस्येमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे GBS सारख्या गंभीर आजारांचा प्रसार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुणे महानगरपालिकेला (PMC) या परिसरात sewage water treatment plant (STP) उभारण्याची मागणी केली आहे.