Pune Navale Bridge Accident: पुणे नवले ब्रीज अपघातात 7 जणांचा अंत! मृतांची आणि जखमींची नावे समोर

Pune Navale Bridge Accident Latest Update: दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची तसेच रुग्णालयात दाखल असलेल्यांची नावे आता समोर आली आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, प्रतिनिधी:

Pune Navale Bridge Accident Update: पुण्यातील नवले ब्रीजवर झालेल्या भीषण अपघाताने अख्खा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. गुरुवारी दुपारी सातारा पुणे मार्गावर ब्रेक- फेल ट्रकने पंधरा ते वीस गाड्यांना धडक दिली त्यानंतर भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची तसेच रुग्णालयात दाखल असलेल्यांची नावे आता समोर आली आहेत. 

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे समोर: 

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये  स्वाती संतोष नवलकर, वय ३७ वर्ष (विश्वास पॅलेस, धायरी फाटा, पुणे), शांता दत्तात्रय दाभाडे, वय ५४ वर्ष (सत्यसाई अपार्टमेंट, धायरी फाटा, पुणे), दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे, वय ५८ वर्षे (सत्यसाई अपार्टमेंट, धायरी फाटा, पुणे), मोक्षिता हेमकुमार रेड्डी, वय ०३ वर्ष (B 301, पॅराडाईज वन, स्वराज कॅपिटल जवळ, लक्ष्मी चौक, चिखली, पुणे), धनंजय कुमार कोळी, वय ३० वर्ष (कारचालक) (सोनवणे वस्ती, चिखली, पुणे), रोहित ज्ञानेश्वर कदम, वय २५ वर्ष (लोणी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) यांचा समावेश आहे. 

Pune Accident: पुण्यात 2 कंटेनरचा भीषण अपघात, 7 जण ठार तर 20 जखमी, 15 गाड्यांना दिली धडक

रुग्णालयात दाखल प्रवाशांची नावे; 

त्याचबरोबर शहरातील पल्स हॉस्पिटलमध्ये  सोफिया अमजद सय्यद (वय १५ वर्ष, रुपीनगर, निगडी, पुणे), रुकसाना इब्राहिम बुरान (वय ४५ वर्ष), ,बिस्मिल्ला सय्यद (वय ३८ वर्ष, खंडोबा माळ, चाकण, पुणे), इस्माईल अब्बास बुरान (वय ५२ वर्ष, रुपीनगर, निगडी), अमोल मुळे (वय ४६ वर्ष, काळेवाडी फाटा), संतोष सुर्वे (वय ४५ वर्ष, भूमकर नगर, नरे) या प्रवाशांवर उपचार सुरु आहेत.

त्याचबरोबर सय्यद शालीमा सय्यद,  जुलेखा अमजद सय्यद (वय ३२ वर्ष),  अमजद सय्यद (वय ४० वर्ष),  सतीश वाघमारे (वय ३५ वर्ष, शिरूर, खांदाड, नांदेड),सोहेल रमनुद्दीन सय्यद (वय २० वर्ष, निकोडो, चाकण), शामराव पोटे (वय ७९ वर्ष, फ्लॅट नंबर 701, हिंजवडी, पुणे), अंकित सलीयन (वय ३० वर्ष, तारा वेस्ट, आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांच्यावर नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

Advertisement

Indapur News: गाड्या थांबल्या, पोलीस जमले, दृश्य पाहून सगळ्यांचीच तंतरली, इंदापुरात असं काय आढळलं?