देविदास राखुंडे, इंदापूर:
Indapur News: राज्यात हत्या, मारामाऱ्यांचे गंभीर प्रकार वारंवार समोर येत आहेत. पुण्यामध्ये कोयता गँगने धुमाकूळ घातला असून गँगवॉरच्या घटनांनी शहर हादरुन गेले आहे. अशातच आता पुणे जिल्ह्याच्या इंदापुरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदापुरमध्ये गुडघ्यापासून खालील पायाचा भाग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील कळंब निमसाखर मार्गावर कळंब गावच्या हद्दीत एका हॉटेलपासून 500 ते 700 मीटर अंतरावर माणसाच्या डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आला आहे. आज सकाळच्या सुमाराची घटना उघडकीस आली आणि यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून रस्त्यावरुन येणा- जाणाऱ्या वाहनचालकांची एकच धावपळ उडाली.
Pune News : पुणे मेट्रोचा 'असा' वापर, लग्नापूर्वी जोडप्यावर कारवाईची कुऱ्हाड; Video Viral
हा पायाचा भाग पुरुष जातीचा असून तो डाव्या बाजूच्या पायाचा आहे. याची माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे घटनास्थळी दाखल झाले डाव्या बाजूच्या पायाचा गुडघ्यापासून खालील हा भाग असून तो वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत. हा तुटलेला पाय नेमका कुणाचा आहे? हा घातपात आहे की आणखी काय? अशा अनेक प्रश्नांचा तपास पोलिसांना करायचा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world