रेवती हिंगवे, पुणे:
Pune News: पुण्यात १६ वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या नावाखाली अक्षरश उघड्यावर ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महानगरपालिकेकडून वृद्धाश्रमाला जागा दिली जात नसल्याने रुग्णांना असं उघड्यावर ठेवत असल्याचा खुलासा वृद्धाश्रम चालक दादासाहेब गायकवाड यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यात १६ वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या नावाखाली अक्षरश उघड्यावर ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. उपचारांसाठी ससून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या जेष्ठ नागरिकांना परत नेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय येत नाहीत अशा रुग्णांना विविध वृद्धाश्रमांमध्ये काही दिवसांनी पाठवण्यात येते. असे काही रुग्ण ससून रुग्णालयाकडून दादासाहेब गायकवाड चालवत असलेल्या आस्क ओल्ड एज होम या संस्थेकडे सोपवले होते.
Pune News: भीती अन् दहशत! आता घरातून बाहेर पडणं ही अवघड, कोयता गँगने या वेळी जे काही केलं...
ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असून संस्थेचा पुण्यातील फुरसुंगी भागात वृद्धाश्रम असल्याचचा संस्थेकडून दावा करण्यात आला होते. मात्र काही दिवसांनी या संस्थेचा प्रमुख दादासाहेब गायकवाडने संस्थेसाठी सरकारने मोफत जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा या वृद्ध रुग्णांचा सांभाळ करणं आपल्याला शक्य नाही असं म्हणत तो त्या रुग्णांना अक्षरश उघड्यवर घेऊन आला आहे.
पुण्यातील भारत फोर्ज कंपनीच्या समोर कडाक्याच्या थंडीत हे वयोवृद्ध रुग्ण अक्षरश उघड्यावर राहत आहेत. थोडे थोडके नाहीतर १६ वयोवृद्ध रुग्ण इथं बेवारसपणे राहत आहेत. ससून रुग्णालयाने दादासाहेब गायकवाडकडे जेवढे रुग्ण सोपवले होते तेवढे रुग्ण आत्ता तिथे नाहीयेत. या रुग्णांची चौकशी करण्यासाठी जेव्हा रुग्णांचे परिचित तिथं जातायत तेव्हा दादासाहेब गायकवाड उडवाउडवीची उत्तरं देतोय तर ससून रुग्णालय देखील हात झटकत आहे.
Kerla News: लेकीला धमकावलं, नको ते केलं... नराधम पित्याला 178 वर्षांची शिक्षा
दरम्यान, एकदा संस्थेकडे रुग्ण सोपवले की आमची जबादारी संपते , समाजकल्याण आणि धर्मादाय आयुक्ताची जबादारी सुरु होते असं ससून मधल्या संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे. ससूण रुग्णालय आणि वृद्धाश्रम चालकाच्या भूमिकेमुळे वृद्धांची मात्र चांगलीच हेळसांड होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world