Pune News : पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. लहानपणी भावा-बहिणींच्या नात्यामध्ये जिव्हाळा आणि आपुलकी असते. मात्र जेव्हा या नात्यात संपत्तीचा मुद्दा येतो तेव्हा रक्ताच्या नात्यात कधी दुरावा येईल हे सांगता येत नाही. पुण्यातून एक असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यात भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टीसाठी भावाने सख्ख्या बहिणीला मानसिक आजार झाल्याचं भासवून मनोरुग्ण ठरविण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने वैद्यकीय मदत घेतली. यासाठी या भावाने बहिणीला इंजेक्शन दिलं. यानंतर रक्त तपासणी करायचं असल्याचं सांगून बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं. बहिणीच्या प्रॉपर्टीच्या मुळावर उठलेल्या धर्मेंद्र इंदूर रॉय या आरोपीसह चार खाजगी बाऊन्सरवर चतुशृंगी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
56 वर्षे पीडित महिलेची पुण्यातील चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीचा ताबा मिळवण्यासाठी आरोपीने चार बाऊन्सर आणले. त्याने 56 वर्षे पीडितेवर बळाचा वापर करून तिच्या घरात घुसला. महिलेची मानसिक अवस्था चांगली असताना देखील तिच्या डाव्या हातावर इंजेक्शन दिलं. यानंतर रक्त तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचं खोटं सांगून पीडितेला मेंटल रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान या प्रकरणात आरोपी भावाविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.