यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune Passport Office New Address: पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील पासपोर्ट सेवा केंद्राचे स्थलांतर होणार आहे. शहरातील मुंढवा येथे असणाऱ्या पासपोर्ट सेवा केंद्राचे ३० मार्चपासून नवीन ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे, त्यामुळे ज्या नागरिकांची पासपोर्ट अपॉइंटमेंट ३० मार्च किंवा त्यानंतरची आहे, त्यांनी कृपया नवीन पत्त्यावरच भेट द्यावी, असं महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे.
पासपोर्ट सेवा केंद्राचे स्थलांतर
समोर आलेल्या माहितीनुसार, पुणेकर नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र आता नवीन ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. सध्या हे पासपोर्ट ऑफिस घोरपडी-मुंढवा रोड, पिंगळे वस्ती, गंगा ऑर्चिड समोर येथे कार्यरत आहे. त्या ठिकाणाहून हे पासपोर्ट सेवा केंद्र येत्या ३० मार्च २०२६ (सोमवार) पासून बाणेर-पाषाण लिंक रोड, पाषाण येथील मोंटक्लेयर बिल्डिंगमध्ये सुरू होणार आहे.
काय आहे नवीन पत्ता?
या महत्त्वाच्या स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ३० मार्च २०२६ पासून पासपोर्ट संबंधित सर्व कामकाज नवीन ठिकाणीच होणार असून ज्यांची अपॉइंटमेंट ३० मार्च किंवा त्यानंतरची आहे, त्यांनी मुंढवा ऐवजी थेट पाषाण येथेच उपस्थित राहावे. जुन्या ठिकाणी गेल्यास काम होणार नाही, याची नोंद घ्यावी अर्जदारांनी आपल्या ठरलेल्या वेळेनुसार आवश्यक कागदपत्रांसह नवीन केंद्रात उपस्थित राहावे. तसेच या बदलामुळे नागरिकांनी योग्य ठिकाणी वेळेवर पोहोचून गैरसोय टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Raj Thackeray: 'अशोक खरात नीच माणूस, राजकारण्यांचा आशीर्वाद.. 'राज ठाकरेंचं CM फडणवीसांना मोठं आवाहन
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world