Pune News: पुणेकरांनो सावधान! भरदिवसा रस्त्यांवर शुकशुकाट, गरज असेल तरच घराबाहेर पडा; स्थानिकांना गंभीर इशारा

Pune News: पुणेकरांनी सध्या स्वतःची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवरच प्रशासनाकडून मोठे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यात नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Pune News: पुण्यातील रस्त्यावर शुकशुकाट"
प्रतिकात्मक फोटो (Canva)

- यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News: पुणेकरांनो तुम्ही सावध राहण्याची आवश्यकता आहे. गरज असेल तरच दुपारच्या वेळेस घराबाहेर पडा अन्यथा त्रास होण्याची शक्यता आहे. यामागील कारण म्हणजे पुणे शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. मार्च महिन्याचा पहिला आठवडा संपत नाही तोच पुण्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक भागांत तापमानाचा पारा 39 डिग्री अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. यंदाच्या मार्च महिन्यातील ही सर्वाधिक तापमानाची नोंद असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तसेच येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोरेगाव पार्क आणि लोहगाव 'हॉट'स्पॉट | Lohegaon, Koregaon Park Weather Update 

पुण्यातील विविध भागांतील तापमानाचा विचार करता, कोरेगाव पार्क आणि लोहगाव परिसरात सर्वाधिक म्हणजे 39 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ शिवाजीनगर, पाषाण आणि लवळे येथे तापमान 37 डिग्री अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारी 12 वाजेपासून ते 4 वाजेदरम्यान रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. 

विभागांनुसार तापमानाची आकडेवारी | Pune Weather Update News

  • कोरेगाव पार्क: 39 डिग्री अंश सेल्सिअस  
  • लोहगाव: 39 डिग्री अंश सेल्सिअस  
  • शिवाजीनगर: 37 डिग्री अंश सेल्सिअस
  • पाषाण: 37 डिग्री अंश सेल्सिअस
  • लवळे: 37 डिग्री अंश सेल्सिअस
  • मगरपट्टा: 36 डिग्री अंश सेल्सिअस
  • एनडीए परिसर: 36 डिग्री अंश सेल्सिअस
(नक्की वाचा: Heat Wave Alert: राज्यातील 18 जिल्ह्यांना 'हीट वेव्ह'चा इशारा; पारा 40 अंशांवर, मार्चमध्येच पहिली उष्णतेची लाट)उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
  1. भरपूर पाणी प्या: तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी प्यावे. डाएटमध्ये लिंबू पाणी, ताक आणि नारळाचे पाण्याचा समावेश करावा.

  2. वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत कडक ऊन असते, त्यामुळे शक्य असल्यास या काळात बाहेर पडणे टाळा.
  3. पोशाख: बाहेर जाताना सुती आणि फिकट रंगाचे कपडे वापरा. टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.
  4. आहार: आहारात काकडी, कलिंगड यासारख्या पाणीदार फळांचा समावेश करा. अति तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा.
  5. लक्षणे ओळखा: चक्कर येणे, मळमळणे किंवा जास्त डोके दुखत असल्यास त्वरित विश्रांती घ्यावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.