जाहिरात

Pune Palkhi 2025: माऊली अन् बाप्पांची भेट! 'विठूनामा'च्या गजराने पुण्यनगरी दुमदुमली, पाहा सुंदर VIDEO

Ashadhi Wari Pune Palkhi Sohala 2025: पुण्यातील संमगवाडी पुलावर दोन्ही पालख्यांचा संगम झाला. यावेळी लाखो भाविकांच्या गर्दीने अन् विठुरायाच्या गजराने पुण्यनगरी दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळाले. 

Pune Palkhi 2025: माऊली अन् बाप्पांची भेट! 'विठूनामा'च्या गजराने पुण्यनगरी दुमदुमली, पाहा सुंदर VIDEO

Pune Palakhi Sohala Video: जय जय राम कृष्ण हरीचा गजर अन् टाळ मृदुंगाच्या गजरात आषाढी वारीचा भक्तीमय सोहळा सुरु झाला आहे. शुक्रवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले. पुण्यातील संमगवाडी पुलावर दोन्ही पालख्यांचा संगम झाला. यावेळी लाखो भाविकांच्या गर्दीने अन् विठुरायाच्या गजराने पुण्यनगरी दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळाले. 

Pune Palkhi 2025 : पालखी मार्गावर सर्व सोयीसुविधा; पुणे जिल्हा परिषदेकडून स्पेशल APP लॉन्च

आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरातून शुक्रवारी पहाटे सहा वाजता तुकाराम महाराजांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. सायंकाळच्या सुमारास तुकोबा रायांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले. 20 जून आणि 21जून हे दोन दिवस नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात माऊलींची पालखी मुक्कामी असेल. त्यानंतर लोणी काळभोरला मुक्कामासाठी प्रस्थान करेल.

दुसरीकडे संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शुक्रवारी पहाटे आळंदीतील गांधी वाड्यातून  पुण्याकडे मार्गस्थ झाली. रात्री माऊलींच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरासमोर माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत गेले. यावेळी लाखो पुणेकरांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. फुलांनी सजवलेला माऊलींचा रथ, दगडूशेठ मंदिराची सुंदर आरास आणि भाविकांनी फुलून गेलेली गर्दी असा हा अलोट भक्तीमय सोहळा यावेळी पुणेकरांना अनुभवायला मिळाला. ज्याचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा आणि माऊलींच्या भेटीचा हा अलौकिक सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य पुणेकरांना मिळाले. दरम्यान,  माऊलींची पालखी भवानी पेठेतील  मंदिरात दोन दिवसांसाठी मुक्कामी असेल. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. 

Pune Palkhi 2025 : पालखी मार्गावरील सुरक्षेसाठी यंदा एआयची नजर, सुरक्षेसाठी मंदिराच्या बाहेर पडण्याचा मार्गही बदलला

Listen to the latest songs, only on JioSaavn.com