जाहिरात

Pune Palkhi 2025 : लवकरच दोन्ही पालख्या पुणे शहरात होणार दाखल; 'या' 5 ठिकाणी मुबलक पार्किंग

दोन्ही मानाच्या पालखी पुण्यात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. हे बदल 19 जून रात्री 10 पासून ते 23 जून रात्री 11 पर्यंत लागू असतील

Pune Palkhi 2025 : लवकरच दोन्ही पालख्या पुणे शहरात होणार दाखल; 'या' 5 ठिकाणी मुबलक पार्किंग

Pune Palkhi 2025 : जगत् गुरू संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj Palkhi) आणि संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) यांची पालखी लवकरच पुणे शहरात प्रवेश करणार आहे. पुणेकरही दोन्ही पालख्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविक प्रतीक्षा करीत आहेत. दरम्यान अनेकजण पालखी मार्गावर जोडले जातात. ज्यांना पंढरपुरपर्यंत जाणं शक्य नसतं ते पालख्यांचं दर्शन घेतात.

भाविकांना सोपं जावं यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून पालखी मार्ग ट्रॅकिंग सुविधा देण्यात आली आहे. याच्या माध्यमातून तुम्ही संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्या ट्रॅक करू शकता आणि थेट पालखीत सामील होऊ शकता. 

Pune Palkhi 2025 Live : दोन्ही महत्त्वाच्या पालख्या पुण्यात दाखल? आता कुठे आहे पालखी?

नक्की वाचा - Pune Palkhi 2025 Live : दोन्ही महत्त्वाच्या पालख्या पुण्यात दाखल? आता कुठे आहे पालखी?

दोन्ही पालख्या दुपारपर्यंत पुणे शहरात दाखल होणार आहेत. दरम्यान कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग खुले करण्यात आले आहेत. पालखी पुणे शहरात प्रवेश करण्यापासून ते संगमवाडीपर्यंत पर्याय मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. यासाठी वाहतूक विभागाकडून पोलीस रायडर तैनात ठेवण्यात आले आहेत. पुणे शहरात प्रवेश करताना आणि पालखींच्या आजच्या मुक्कामापर्यंत वाहतूक पोलिसांचे रायडर तैनात आहेत. ते पालखीसंदर्भातील प्रत्येक अपडेट साइटवर अपडेट करतील. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठी सोय होणार आहे.

Latest and Breaking News on NDTV

या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. हे बदल १९ जून रात्री १० पासून ते २३ जून रात्री ११ पर्यंत लागू असतील. दरम्यान https://diversion.punepolice.gov.in/palkhi/track या लिंकवर क्लिक करून तुम्ही पालखी सोहळ्याचे लेटेस्ट अपडेट मिळवू शकता.  

वाहने कुठे पार्किंग करू शकता? (Parking in Pune Palkhi Route)

- रेस कोर्स परिसर 
- एस पी महाविद्यालय 
- न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड परिसर 
- SSPMS व COEP महाविद्यालय मैदान, सिंचन, आपटे प्रशाला
- न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, आबासाहेब गरवारे कॉलेज, विमलाबाई गरवारे कॉलेज

वाहतुकीत काय आहेत बदल? (Traffic Diversions in Pune Palkhi Route)

- बोपोडी चौक (हॅरिश ब्रिज, खडकी)
- राजीव गांधी ब्रिज - औंध 
- ब्रेमेन चौक
- बोपखेल फाटा 
- खराडी बायपास चौक 
- केसनंद गाव 
- केसनंद फाटा चौक 
- लोणीकंद (थेऊर फाटा) 
- तुळापूर फाटा 
- राधा चौक 
- सुस रोड 
- चांदणी चौक 
- वारजे जंक्शन 
- वडगाव ब्रिज 
- नवले ब्रिज 
- भूमकर चौक 
- कात्रज चौक 
- खडी मशीन चौक 
- मंतरवाडी फाटा 
- वैदुवाडी चौक 
- थेऊर फाटा 
- दिवे घाट 
- रविदर्शन

मुख्य रस्त्यांमध्येही केले बदल... (Changes in Pune Main Raod)

पुणे शहरातील अंतर्गत वाहतुकीत देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. आणि आवश्यकतेनुसार फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, रेंज हिल ते संचेती चौक, डेक्कन ते कोथरूड, लक्ष्मी रोड ते बेलबाग चौक, शिवाजी रोड, डेक्कन वाहतूक विभाग ते आपटे रोड, गणेशखिंड रोड आणि इतर मुख्य रस्ते यातही बदल करण्यात येणार आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com