सुरज कसबे, प्रतिनिधी
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा ओढ लागलीय ती भगवान विठ्ठलाच्या भेटीची. 6 जुलैला आषाढी एकादशी असून महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवू लागल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 19 जून ला असून 5 जुलै पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. त्यानंतर 5 ते 9 जुलै पंढरपुरात मुक्काम केल्यानंतर माऊलींची पालखी पुन्हा दहा तारखेला पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीचा प्रवास करणार आहे.
नक्की वाचा : पालखी सोहळ्यासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल, वाचा सर्व अपडेट सविस्तर
पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी ही पूर्ण झाली असल्याची माहिती आळंदी देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे .पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्था वैद्यकीय सेवा पाणीपुरवठा स्वच्छता ग्रह हे अग्निशामन व्यवस्था आधी सुविधांचे याबाबत नियोजन करण्यात आले आहे. माऊलींची पालखी 20 तारखेला पुणे जिल्ह्यात दाखल होणार आहे.
पालखीचा मुक्काम कुठे कुठे असणार? (Sant Dnyaneshwar Maharaj Departs Check Full Schedule)
पुण्यात दोन दिवस पालखी मुक्कामी असल्यानंतर 22 तारखेला पुण्याहून सासवडच्या दिशेला प्रस्थान ठेवणार आहे. 24 तारखेला पुन्हा सासवड होऊन जेजुरीच्या दिशेने पालखीचा प्रवास असेल. 25 तारखेला पालखी वाल्हे येथे पोहोचेल त्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना निरास्नान होईल. 27 तारखेला लोणंद येथे पुढे जाताना चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं पहिलं उभे रिंगण होईल. 1 जुलै नातेपुते येथील पुरंदवडे या ठिकाणी पहिले गोल रिंगण पार पडेल. 2 जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल, तीन जुलै वेळापूर येथे तिसरे गोल रिंगण होईल, 4 जुलैला दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावाची विहीर याठिकाणी होईल त्यानंतर पालखी वाखरी येथे मुक्कामी पोहोचेल. 5 जुलै रोजी वाखरी येथे तिसरे उभे रिंगण पार पडल्यानंतर पालखी पंढरपूर या ठिकाणी दाखल होईल .
नक्की वाचा - Ashadhi wari 2025 : देहूनगरीत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष, तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान; कसा असेल पालखीमार्ग?
6 जुलै आषाढी एकादशी निमित्ताने माऊलींच्या पालखीचे पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर माऊलींच्या पादुकांना चंद्रभागा नदी स्नान घालण्यात येईल. नंतर माऊलींची पालखी 10 जुलै रोजी गोपाळकाला झाल्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास पंढरपूर ते आळंदी असा करणार आहे. तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये पालखी 21 जुलै रोजी पोहचणार आहे .
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025 (Pune Palkhi 2025 )
-
- 19 /06/2025 माऊली पालखी प्रस्थान आळंदी
- 20/06/2025 आळंदी ते पुणे, 29 कि.मी
- 21/06/2025 पुणे मुक्काम
- 22/06/2025 पुणे ते सासवड, 32 कि.मी
- 23/06/2025 सासवड मुक्काम
- 24/06/2025 सासवड ते जेजुरी, 16 कि.मी
- 25 /06/2025 जेजुरी ते वाल्हे, 12 कि.मी
- 26 /06/2025 वाल्हे ते लोणंद, 20 कि.मी
- माऊलींना निरास्मान
- 27/06/2025 लोणंद ते तरडगाव, 08 कि.मी
- 28/06/2025 तरडगाव ते फलटण, 21 कि.मी
- 29/06/2025 फलटण ते बरड, 18 कि.मी
- 30/06/2025 बरड ते नातेपुते, 21 कि.मी
- बरड येथे गोल रिंगण
- 01/07/2025 नातेपुते ते माळशिरस, 18 कि.मी
- सदाशिवनगर येथे गोल रिंगण
- 02/07/2025 माळशिरस ते वेळापूर, 19 कि.मी
- खुडूस येथे गोळ रिंगण
- 03/07/2025 वेळापूर ते भंडी शेगाव, 21 कि.मी
- ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा
- 04/07/2025 भंडी शेगाव ते वाखरी, 10 कि.मी
- बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
- 05/07/2025 वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
- वाखरी येथे गोल रिंगण
- 06/07/2025 देवशयनी आषाढी एकादशी
- 10 /07/2025 पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास