Pune Palkhi 2025 : तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी (Tukaram Maharaj Palkhi and Dnyaneshwar Mauli Palkhi) दोन दिवस पुण्यात मुक्कामी होती. अखेर आज सकाळी दोन्ही पालख्या आपल्या पुढील मुक्कामासाठी रवाना झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवेघाटातून सासवड मार्गे जाईल. यंदा दिवेघाटातील टेकडीवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव टेकडीवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज वारीतील सर्वात मोठा टप्प्यासाठी रवाना झाल्या आहेत. यंदा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवडला असेल. त्यानुसार, पुणे ते सासवड असा 32 किलोमीटरचा मार्ग वारकरी पार करतील. हा प्रवास काहीसा कठीण असला तरी वारकरी माऊलींचं नाव घेत एक एक पाऊल टाकत जात असतात.
पुणे पालखी ट्रॅक करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...
Live Update : संत तुकाराम महाराज पालखीचा आजचा मुक्काम लोणी काळभोर येथे
संत तुकाराम महाराज पालखीचा आजचा मुक्काम लोणी काळभोर येथे आहे. सध्या ही पालखी फॉर्च्युन इस्टेटहून पुढे गेली आहे.
Live Update : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वडकी गावात पोहोचली
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वडकी गावात पोहोचली. तर दुसरीकडे तुकाराम महाराजांची पालखी १५ नंबर मांजरी फाटा येथे दाखल झाली आहे.
Live Update : संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थळी भागवत एकादशी निमित्त भाविकांची मांदियाळी
हिंगोलीच्या नरसी नामदेव येथे आज संत शिरोमणी नामदेव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळते, आज भागवत एकादशी असल्याने हिंगोली जिल्ह्यातील आणि विदर्भातील अनेक भाविक, वारकरी हे नरसी नामदेव येथे दाखल झाले असून यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी दिसून आलीय..
Live Update : संता तुकाराम महाराजांची पालखी हडपसर गाडीतळ येथून रवाना
संत तुकारामांची पालखी हडपसर गाडीतळ येथून रवाना झाली आहे...
Live Update :संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उरुळी देवाचीहून सासवडच्या दिशेने रवाना...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उरुळी देवाचीहून सासवडच्या दिशेने रवाना...
Live Update : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मुक्कामाची यादी...
Live Update : संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम कुठे कुठे असेल?
Live Update : दोन्ही पालख्या मध्य विरामासाठी लवकरच थांबतील, तुकाराम महाराजांची पालखी हडपसर गाडीगडला पोहोचली
संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर गाडीगळ येथे पोहोचली असून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उरुळी देवाची फाटा क्रॉस करीत आहे.
Live Update : संतांच्या आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपुरात महास्वच्छता अभियान
आषाढी वारीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी आज पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवले जाते आहे. तब्बल साडेचार ते पाच हजार अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या हातून शहरात 42 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जाते आहे. यामध्ये ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे हे सहभागी झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरपूर शहर हे चकाचक झाले आहे. निर्मल वारी करण्याचे ध्येय यंदा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठेवले आहे. यातूनच पंढरपुरात महास्वच्छता होती आहे
Live Update : माऊलींची पालखी मंतरवाडीवरुन लोणी काळभोरच्या दिशेने
संत तुकाराम महाराजी पालखी हडपसर गाडीतळाजवळ पोहोचली असून माऊलींची पालखी मंतरवाडीवरुन पुढे जात आहे.
Live Update : पाऊले चालती पंढरीची वाट, दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अशा दोन्ही पालख्या दोन दिवस पुण्यात मुक्कामी होत्या. आज पहाटे या पालख्यांचे धार्मिक विधी पार पडून त्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. पुणे शहरांमधून या पालख्या पुढे जात असतात. त्यामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. प्रशासन देखील या पालख्या निर्विघ्नपणे पुण्यातून बाहेर पडाव्यात याकरिता तयारीत आहेत. माऊलींची पालखी हडपसरच्या पुढे दिवेघाटातून सासवडच्या दिशेने मार्गक्रमण करतील.
Live Update : संत तुकाराम महाराजांची पालखी मगरपट्टा पुलावरुन वैभव थिएटरजवळ
संत तुकाराम महाराजांची पालखी मगरपट्टा पुलावरुन वैभव थिएटरजवळ (11.42 am) पोहोचली.
Live Update : पंढरपुरात 4 हजार सायकल स्वारांचे झाला रिंगण सोहळा
आषाढी वारीचे महाराष्टक वेध लागले आहे. अनेक संताच्या पालख्यांचे रिंगण सोहळे ही आता होतील. त्यापूर्वीच पंढरपूरात 4 हजार सायकल स्वार यांचा रिंगण सोहळा संपन्न झाला. वारकरी शिस्तीप्रमाणे 4 हजार सायकल स्वार यांनी हरिनामाचा जयघोष करत रिंगण सोहळा पार पडला.
Live Update : आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळाकडून पंढरपूर वारीसाठी भाविकांना थेट गावातून लालपरीची सेवा
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यावर्षी भाविक गट तयार करून एकत्र बस बुक केल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत लालपरीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून १०० हून अधिक बस गाड्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. भाविकांची संख्या लक्षात घेता एसटी प्रशासनाने बसांची बुकिंग प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व प्रमुख एसटी आगारांमध्ये सुरू केली आहे.
यंदाही महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत लागू राहणार आहे, ही एक सकारात्मक बाब असून अनेक महिला वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
Live Update : तुकाराम आणि माऊलींच्या पालखीचं दर्शन कुठे घेता येईल?
संत तुकाराम महाराजांची पालखी भैरोबा नाल्याजवळून मार्गस्थ तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी नाल्याच्या दिशेने रवाना
Live Update : पालखीदरम्यान वाहनं कुठे पार्क करू शकता?
पालखीदरम्यान वाहनं कुठे पार्क करू शकता?
वाहने कुठे पार्किंग करू शकता?
- रेस कोर्स परिसर
- एस पी महाविद्यालय
- न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड परिसर
- SSPMS व COEP महाविद्यालय मैदान, सिंचन, आपटे प्रशाला
- न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, आबासाहेब गरवारे कॉलेज, विमलाबाई गरवारे कॉलेज