Pune Palkhi 2025 : तुकोबांची पालखी दापोडीच्या दिशेने रवाना; ज्ञानोबांची पालखी कधीपर्यंत होणार मार्गस्थ? 

आज सकाळपासून पुण्यात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे वारकरी मोठ्या उत्साहाने विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात साठवत एक एक पाऊल पुढे जात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरज कसबे, प्रतिनिधी

जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj Palkhi) यांचा पालखी सोहळा आपला दुसरा मुक्काम आटोपून पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे. जय हरी विठ्ठलाच्या जयघोषात वारकरी पुण्याच्या दिशेने निघाले आहेत. आज सकाळपासून पुण्यात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे वारकरी मोठ्या उत्साहाने विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात साठवत एक एक पाऊल पुढे जात आहेत.

या पालखी सोहळ्याचा सकाळचा विसावा पिंपरी चिंचवड शहरातील H.A. कॉलनीतील विठ्ठल मंदिरात असेल तर दापोडी येथे दुपारचा मुक्काम करून सोहळा चार वाजताच्या सुमारास संगमवाडी परिसरातून  पुण्यात दाखल होईल आणि पुण्यातील नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात या सोहळ्याचा दोन  मुक्काम असेल. 

नक्की वाचा - Pune Palkhi 2025 Live Tracking : कुठे आहे पालखी? एकाच क्लिकवर करा Track; वाहतुकीचे बदल, पुढचा टप्पा याचीही माहिती मिळणार!

Advertisement

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने ठेवले पुण्याच्या दिशेने प्रस्थान.. ( Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi)

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आपल्या दुसऱ्या मुक्कामासाठी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. आळंदीतील गांधी वाड्यातील रात्रीचा मुक्काम आटोपून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास थोरल्या पादुका मंदिरात पालखीची पहिली आरती आणि सकाळचा विसावा असेल त्यानंतर फुमेनगर येथे पालखी सोहळा दुपारचा विसावा घेऊन संध्याकाळी 4 च्या सुमारास संगमवाडी परिसरातून पुण्यात दाखल होईल.

त्यानंतर भवानी पेठेतील मंदिरात या सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम असेल. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालखी सोहळे जेव्हा पुण्यात दाखल होतील तेव्हा या भक्ती सागराचा अनोखा संगम बघायला मिळणार असल्याने पुणेकर आणि भक्तांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. 

Advertisement