जाहिरात

Rain News: पुण्याला मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट'! उर्वरित महाराष्ट्रात कसा असेल पाऊस?

Pune Rain alert News: पुणे जिल्ह्यासह घाट परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Rain News: पुण्याला मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट'! उर्वरित महाराष्ट्रात कसा असेल पाऊस?
प्रातिनिधीक फोटो

यशपाल सोनकांबळे, पुणे

पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला असून, पुणे घाट परिसराला आज पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण सकाळी 7 वाजेपर्यंत 73% क्षमतेने भरले असून, लवकरच धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची दाट शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.

खडकवासला पाटबंधारे विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या सूचनेनुसार,पुढील काही तासांत खडकवासला धरण 80 टक्क्यांहून अधिक भरण्याची शक्यता आहे. पावसाचा वाढता जोर पाहता धरणाच्या सांडव्यावरून कोणत्याही क्षणी मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू केला जाऊ शकतो. नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदीपात्रातील जनावरे किंवा साहित्य असल्यास ते तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी.

(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')

घाटात अतिवृष्टी; भिरा, ताम्हिणी आणि लोणावळ्यात धुवाधार पाऊस

गेल्या 24 तासांत पुणे आणि कोकण जोडणाऱ्या घाटमाथ्यावर तुफान पाऊस झाला आहे.

  • भिरा: सर्वाधिक 148 मिमी
  • ताम्हिणी घाट: 120 मिमी
  • लोणावळा: 115 मिमी
  • शिरगाव: 120 मिमी 
  • आंबोणे: 116 मिमी 
  • डुंगरेवाडी: 100 मिमी

पुणे शहरातील पावसाची नोंद

  • शिवाजीनगर - 20.1 मिमी
  • लोहगाव - 21.6 मिमी
  • एनडीए - 21 मिमी
  • चिंचवड - 16 मिमी
  • कोरेगाव पार्क - 14 मिमी 

(नक्की वाचा-  Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी पुणे एसटी विभागाची मोठी घोषणा! 350 हून अधिक विशेष बसगाड्या सोडणार)

राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचे इशारे

हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा येथा अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि नाशिक परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.  तर बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com