जाहिरात

अजित दादांचं स्वप्न पूर्ण होणार; पुणे ZP अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही संधी

पुणे जिल्हा परिषदेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यंदा ३०१ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे.

अजित दादांचं स्वप्न पूर्ण होणार; पुणे ZP अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही संधी

Pune ZP Budget : पुणे जिल्हा परिषदेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यंदा ३०१ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या मूळ अंदाजपत्रकापेक्षा यंदा 9 कोटींचा अधिकचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची 200 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाला जास्त प्रोत्साहन देण्यात येईल याकडे प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं. या अर्थसंकल्पात शिक्षण आणि आरोग्यावर भर देण्यात आला.

पुण्यात दोन सायन्स पार्क उभारणार...

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी एआय आत्मसात करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून त्याला कौशल्य सेतू असं नाव देण्यात आलं आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सज्ज करावेत यासाठी अर्थसंकल्पात प्रयत्न करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार पुण्यात दोन सायन्स पार्क ही उभारणार येणार असून स्किल सेंटर उभारण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी दिव्यांग स्वावलंबन योजना, एकल महिलांसाठी माझे अस्तित्व योजना, जिल्हा परिषद फेलोशिप योजना, विद्यार्थ्यांच्या मानसिक बौद्धिक वाढीकरता ध्यान आणि योगसाधना सुरू करण्यात येणार आहे. सोलर पार्कची उभारणी करून सौर्यऊर्जेवर गावाची वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

नक्की वाचा - Pune Sagar Moholkar death :थेट तोंडात गोळी, शरीरात 4 गोळ्या अडकलेल्या; कुख्यात गुंडाचा पुण्यात तडफडून The End!

इस्रो, नासा, युरोपियन स्पेस सेंटरमध्ये वैज्ञानिक सहल काढण्यात येणार. जिल्हा परिषद शाळेतील 6 वी 7 वी च्या विद्यार्थ्यांना या सहलींना घेऊन जाण्यात येणार आहे. यासाठी इस्रो 50 मुलांना नासा 25 मुलांना आणि युरोपियन स्पेस सेंटर 25 विद्यार्थी पाठविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांचे CBSE सलग्नीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील एक शाळा सीबीएसइ केली जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेमधील निवडक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण आणि मंडळाशी संलग्न करण्याचा प्रस्ताव आहे.

शिक्षकांसाठी जागतिक अनुभव कार्यक्रम ग्लोबल गुरुजी योजना

पुणे जिल्ह्यातील 50 उत्कृष्ट शिक्षकांना आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा अनुभव देण्यासाठी राबवण्याचा प्रस्ताव याअंतर्गत शिक्षकांना फिनलंड आणि सिंगापूर यासारख्या उच्च दर्जाच्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थित साठी भेटी देण्याची संधी देण्यात येणार असून महिलांसाठी फिरते शॉपी आणि सावित्री कॅफे योजना सुरू करण्यात येणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com