प्रसाद पाटील, रायगड:
Raigad Fort Ropeway News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडवर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. किल्ले रायगडवर वयोवृद्ध तसेच शाळकर मुलांच्या सोयीसाठी असणारा रोपवे काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी हा बंद ठेवण्यात येणार असून परिपत्रक काढून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
रायगड रोप वे बंद
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या रायगड रोप-वेची वार्षिक तांत्रिक देखभाल व आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. २३ फेब्रुवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हे काम करण्यात येणार आहेत. या कामांमुळे सदर कालावधीत रोप-वे सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
दरवर्षी सुरक्षितता व सेवा-सातत्य राखण्यासाठी रोप-वेची तांत्रिक तपासणी, देखभाल तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे केली जातात. त्याचाच भाग म्हणून ही वार्षिक देखभाल राबवली जाणार असल्याचे रोप वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कालावधीत रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांनी रोप-वे सेवेचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानात स्फोटके होती का? अमोल मिटकरींचा सवाल
दुरुस्तीच्या कामासाठी बंद
२८ फेब्रुवारीनंतर सर्व कामे पूर्ण करून १ मार्च २०२६ पासून रोप-वे सेवा पुन्हा पर्यटकांच्या सेवेसाठी सुरळीतपणे सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पर्यटकांनी नियोजन करताना या बंद कालावधीची नोंद घ्यावी, असेही रोप वे प्रशासनाने कळविले आहे. दरम्यान, अनेक वयोवृद्ध पर्यटकांना या रोपवेचा फायदा होतो तसेच वेळेची बचतही होते.
(नक्की वाचा- Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world