मेहबूब जमादार, रायगड: शिवसेना शिंदे गटाचे वजनदार नेते अन् मंत्री भरत गोगावले त्यांच्या रोखठोक विधानांसाठी, बेधडक भाषणांसाठी चर्चेत असतात. मंत्रिपदावरुन केलेली विधाने असो किंवा आत्ता रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या वादावरुन इशारा असो, भरत गोगावलेंच्या फटकेबाजीची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. अशातच आता भरत गोगावलेंनी थेट त्यांच्या लग्नाचाच खास किस्सा सांगितला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत भरत गोगावले?
राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या पत्नी सोबतचा जीवन प्रवास सांगताना लग्नाचा खास किस्सा सांगितला. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. आधी पटवली मग लग्न केले, असे विधान भरत गोगावले यांनी केले. रायगडमधील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. भरत गोगावले यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
यावेळी बोलताना भरत गोगावले यांनी पत्नी सुषमाताई गोगावले यांच्या बाबत बोलताना अगोदर पटवली आणि मग लग्न केले. त्यानंतर वडील आपले गावी आहेत, घरची जबाबदारी आहे. मुंबई वरुन शेती करायला गावी आलो. तिनेही तेवढीच साथ दिली, भात लावण्यापासून, कापण्यापासून, मळणी करणे, गुरांचे शेण काढणे, गवत काढणे सगळ केल. म्हणून आज सुखाचे हे दिवस बघतेय ती.. असे म्हणत पत्नीचे कौतुकही केले.
नक्की वाचा - Mumbai water crisis: टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, आता...