Raigad News: मिमिक्री केली, तुमची उलटी गिनती सुरु! शिंदेंच्या शिलेदाराचा सुनील तटकरेंना इशारा

राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली होती. गोगावले यांच्याजवळ एक नॅपकीन असतो, त्यावरून तटकरेंनी गोगावलेंची नक्कल केली होती. ही नक्कल शिंदेंच्या शिवसेना नेत्यांना फारशी रुचलेली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा

रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि सुनील तटकरे यांच्यात वाद वाढत आहे. महेंद्र थोरवे यांनी तटकरेवर टीका करत, भरत गोगावले यांच्या मिमीक्रीवरून उलटी गिनती सुरू असल्याचे म्हटले. तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.

आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली? आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

मेहबूब जमादार, रायगड: रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामधील वाद शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या नॅपकीन स्टाईलची नक्कल केली होती. यावरुनच आता शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भरत गोगवले हे जिंदादिल व्यक्तिमत्व आहेत. जिंदगी जिंदादिली का नाम है असे म्हणत भरत गोगावले यांची मिमिक्री करता आता तुमची उलटी गिनती सुरु झाली आहे, असा थेट इशारा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिला आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है? असं देखील महेंद्र थोरवे यांनी म्हंटलं आहे. तर भारत गोगवले यांची मिमीक्री करत आता तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे अशी टीका महेंद्र थोरवे यांनी केले. भरत गोगवले हे जिंदादिल व्यक्तिमत्व आहेत. जिंदगी जिंदादिली का नाम है. तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है? असे म्हणत महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. भरत गोगवले यांची मिमीक्री करत आता तुमची उलटी गिनती सुरू झाली असल्याचा इशारा देखील थोरवे यांनी दिला आहे. 

(ट्रेंडिंग बातमी - Political News: सुप्रिम कोर्टाचा दणका! 'ते' दोन टेंडर झाले रद्द, शिंदेंचे टेन्शन वाढणार?)

दरम्यान, "पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर बघा. ज्या दिवशी तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली त्याचवेळी उलटी गणती सुरू झाली असेल म्हणत सिंचन घोटाळा  फाईल अजून बंद झाली नाही, कायदा आम्हालाही समजतो या शब्दांत त्यांनी सुनील तटकरे यांना इशारा दिला.
 

Advertisement
Topics mentioned in this article